शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:38 IST

Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला.

काल लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी एनडीएने निर्विवाद विजय मिळवला. एनडीएतील सर्व घटक पक्षांनी मिळून २४३ पैकी तब्बल २०२ जागा जिंकल्या. तर महाआघाडीला ४० जागाही जिंकता आल्या नाहीत. एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. यातील काही प्रमुख लढती पुढील प्रमाणे.

बिहारमधील संदेश विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकाने निकाल लागला. येथे जेडीयूचे उमेदवार रामचरण साह यांनी केवळ २७ मतांनी विजय मिळवला. साह यांना ८० हजार ५९८ मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आरजेडीचे दीपू सिंह यांना ८० हजार ५७१ मतं मिळाली. येथील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार राजीव रंजन  राज यांना ६०४० मतं मिळाली.

अगिआंव मतदारसंघातही अगदी माफक फरकाने जय पराजचा निर्णय झाला. येथे भाजपाचे उमेदवार महेश पासवान यांनी केवळ ९५ मतांनी बाजी मारली. त्यांनी सीपीआय माले पक्षाचे उमेदवार शिव रंजन यांना पराभूत केले.  

बलरामपूर मतदारसंघातही अटीतटीची लढत झाली. येथे एलजेपीआर पक्षाच्या संगीता देवी यांनी अवघ्या ३८९ मतांनी बाजी मारली. संगीता देवी यांनी एमआयएमचे उमेदवार मोहम्मद आदिल हुसेन यांना पराभूत केले. तर बख्तियारपूर मतदारसंघात एलजेपीआर पक्षाचे उमेदवार अरुण कुमार हे ९८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी आरजेडीचे उमेदवार अनिरुद्ध कुमार यांना पराभूत केले. 

बोधगया विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार कुमार सर्वजित हे ८८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी एलजेपीचे उमेदवार श्यामदेव पासवान यांना पराभूत केले.  तर चनपटिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिषेक रंजन यांनी ६०२ मतांनी विजय मिळवला.  त्यांनी भाजपाचे उमेदवार उमाकांत सिंह यांना पराभूत केले. तर ढाका मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार फैसल रहमान यांनी १७८ मतांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या पवनकुमार जैसवाल यांचा पराभव केला. याशिवाय फारबिसगंज मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मनोज विश्वास यांनी २२१ मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या विद्या सागर केशरी यांना पराभूत केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Results: Nail-biting finishes in several constituencies!

Web Summary : NDA secured a victory in Bihar, but some seats saw incredibly tight races decided by mere dozens or hundreds of votes, showcasing intense competition.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल