शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उभारावा लागला बंडाचा झेंडा, सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 14:56 IST

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे.

ठळक मुद्देमी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होतीमी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा माझ्यात सगळे गुण होते. मात्र आता मी निरुपयोगी झालोयराजस्थानमध्ये जेव्हा पक्ष २१ जागांवर गुंडाळला गेला होता. तेव्हा मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनलो आणि पक्षाला आम्ही सत्तेपर्यंत घेऊन गेलो

नवी दिल्ली/जयपूर - गेल्या महिनाभरापासून राजस्थानमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे. दरम्यान, राजस्थानमधील आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात बंड करण्यामागचं कारण सचिन पायलट यांनी आता सांगितले आहे.''मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन,'' असे सचिन पायलट यांनी सांगितले. राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आल्यानंतर आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट यांनी सांगितले.या मुलाखतीत पायलट म्हणाले की, आधी काय झालं आणि पुढे काय होईल, याबाबत मी काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी काही अशा शब्दांचा वापर केला गेला. ज्यामुळे मला वाईट वाटले. मात्र मी हा कडवट घोट प्राशन केला आहे. राजकारणामध्ये शब्दांचा जपून वापर केले गेला पाहिजे. कारण जनता आपले म्हणणे ऐकत असते. जेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा माझ्यात सगळे गुण होते. मात्र आता मी निरुपयोगी झालोय, अशा शब्दात पायलट यांनी गहलोत यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.राजस्थानमध्ये जेव्हा पक्ष २१ जागांवर गुंडाळला गेला होता. तेव्हा मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनलो आणि पक्षाला आम्ही सत्तेपर्यंत घेऊन गेलो. मी लोकांना जोडून चालणारा माणूस आहे. पक्षात फूट पाडणे हा माझा स्वभाव नाही, तसेच मी कुठल्याही प्रकारच अहंकारही बाळगत नाही. जे आमदारा पक्षासाठी तुरुंगात गेले. ते बंडखोरी कशी काय करू शकतात. जे इंदिरा गांधींसोबत काम करू आणि लाठ्याकाठ्या झेलून इथपर्यंत आले आहेत, ते बंडखोर कसे झाले, असा सवालही पायलट यांनी उपस्थित केला.मला पक्षाने खूप पदं दिली. मात्र याचा अर्थ मी गप्प बसावं असा होत नाही. जे योग्य वाटेल ते मी बोलत राहीन. तुम्ही कुणाला पद द्याल, सोबत मान-सन्मान नसेल. मी केवळ घर आणि गाडी कमावण्यासाठी पद मिळवणाऱ्यांमधील नाही आहे. ज्यांच्या खांद्यावर चढून आम्ही सरकारमध्ये आलो आहोत, त्यांचा मान राखला गेला पाहिजे, तसेच त्यांची कामं झाली पाहिजेत, असेही पायलट यांनी सांगितले.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानPoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोत