शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाक कलाकारांचा कार्यक्रम उधळला

By admin | Updated: October 26, 2015 02:31 IST

गुडगाव महापालिकेने एका खुल्या नाट्यगृहात आयोजित केलेला पाकिस्तानच्या नाटक मंडळींचा नाटकाचा प्रयोग शिवसेनेने उधळून लावला

गुडगाव : गुडगाव महापालिकेने एका खुल्या नाट्यगृहात आयोजित केलेला पाकिस्तानच्या नाटक मंडळींचा नाटकाचा प्रयोग शिवसेनेने उधळून लावला. संबंधित नाटकाच्या प्रयोगात चार पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्याची माहिती मिळताच शिवसैनिक कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी धिंगाणा घातला. दरम्यान, रविवारी या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली.भारत-पाक उभय देशांतील संबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने शनिवारी रात्री मास ग्रुप फाऊंडेशन ही पाकिस्तानमधील नाटक मंडळी ‘बान्झ’ नावाचे नाटक सादर करीत होती. याचदरम्यान स्वत:ला शिवसैनिक सांगणारे सुमारे पाच ते सहा जण नाट्यमंचावर चढले आणि त्यांनी जोरदार गोंधळ घातला. पाकिस्तानविरोधी नारेबाजी करीत त्यांनी नाट्यप्रयोग बंद पाडला. या प्रकरणी गुडगाव महापालिकेने दिलेल्या तक्रारीवरून चौघांना अटक करण्यात आली आहे. अजय, गौतम, सुमित आणि जितू, अशी त्यांची नावे आहेत. आम्ही सुरक्षेसाठी पोलिसांना सूचना दिली होती. मात्र, पोलीस घटनास्थळी आले आणि लगेच निघून गेले. यानंतर शिवसैनिकांनी गोंधळ घालत आमचा कार्यक्रम उधळून लावला, असा आरोप कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे. यापूर्वी शिवसेनेने पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई व पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास आयोजकांना भाग पाडले होते. पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी भाजपचे माजी सदस्य सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शाईहल्ला केला होता.