शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

ती पत्नी आहे, कामवाली नाही; पतीने स्वयंपाक, धुणीभांडीत हातभार लावलाच पाहिजे: सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:15 IST

न्यायालयाने बदलत्या सामाजिक मूल्यांची जाणीव आणि समतेवर आधारित वैवाहिक नात्याची गरज अधोरेखित केली आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पतींनी घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेणे ही काळाची गरज आहे. असे केल्याने ते काही उपकार करत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यातून न्यायालयाने बदलत्या सामाजिक मूल्यांची जाणीव आणि समतेवर आधारित वैवाहिक नात्याची गरज अधोरेखित केली आहे.

२०१७ मध्ये विवाह झालेल्या दाम्पत्याला आठ वर्षांचा मुलगा आहे. पती सरकारी शाळेत शिक्षक असून, पत्नी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या पतीपेक्षा अधिक सक्षम आहे. पतीने कुटुंब न्यायालयात क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीचा आरोप आहे की, विवाहानंतर अवघ्या आठवडाभरात पत्नीच्या वागणुकीत मोठा बदल झाला. पती व त्याच्या घरच्यांशी अपमानास्पद भाषा वापरू ती लागली. तिने घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यास नकार दिला.

घरगुती जबाबदाऱ्या दोघांनी पार पाडल्या पाहिजेत

याउलट पत्नीने दावा केला की, ती पती व कुटुंबीयांच्या संमतीने बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. मात्र, त्यांनी बारशाला उपस्थिती लावली नाही आणि तिच्या आई-वडिलांकडून रोख रक्कम व सोन्याची मागणी केली. तिच्या पगारातून तिला जबरदस्तीने पैसे द्यावे लागत असत. कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. मात्र, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही स्पष्ट शब्दांत सांगितले की, वैवाहिक जीवनामध्ये घरगुती जबाबदाऱ्या दोघांनीही समानपणे पार पाडल्या पाहिजेत.

काळ बदलला आहे

तुम्ही नोकराणीशी नाही, तर जीवनसाथीशी विवाह करत आहात, असे न्या. संदीप मेहता यांनी म्हटले आहे. यात न्या. विक्रम नाथ यांनी भर घातली. काळ बदलला आहे.  पतींनीही घरकामात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. आजचा काळ वेगळा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पत्नीने स्वयंपाक किंवा घरकाम न करणे हे क्रूरतेचे लक्षण ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife is a partner, not a servant: Supreme Court on shared chores.

Web Summary : Supreme Court emphasizes shared household responsibilities in marriage. Refusal to cook isn't cruelty. A professor sought divorce, alleging cruelty, but the court stressed equality. Husbands must actively participate in housework; times have changed.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFamilyपरिवारDivorceघटस्फोट