शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी 170 आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला? शरद पवारांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 22:07 IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.

नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत तिढा निर्माण झाल्याने राज्यात नव्या सरकारचा शपथविधी अद्याप होऊ शकलेला नाही. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत यांनी शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता शरद पवार यांनी गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी हा आकडा कुठून आणला हे माहिती नाही. कदाचित भाजपाचे काही आमदार त्यांच्या बाजूने असावेत, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रासरमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेकडून आमच्याकडे पाठिंब्याबाबत विचारणाच झालेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  शिवसेनेला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याच्या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विधानाबाबत विचारणा केली अता शरद पवार म्हणाले की, "संजय राऊतांनी हा आकडा कुठून आणला हे माहिती नाही. कदाचित भाजपाचे काही आमदार त्यांच्या बाजूने असावेत. संजय राऊत हे माझे राज्यसभेतील सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही भेटत असतो. मात्र आमच्या नुकत्याच झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही,'' असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सस्पेन्स वाढवणारे विधान केले. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून तसा प्रस्तावच आलेला नाही, मग त्यावर विचार कसा करणार, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांना पुन्हा भेटणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय खेळ अजून काही काळ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण