शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

Video: ही लाजीरवाणी गोष्ट...  मंत्र्याच्या मुलास धडा शिकवणाऱ्या महिला पोलिसावर राजीनाम्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:42 PM

गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली.

ठळक मुद्देगुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली. संचारबंदी असतानाही मास्क न वापरता कारमधून 5 युवकांसह जात असलेल्या प्रकाश आणि त्याच्या मित्रांना सुनिता यादव यांनी अडवले होते.

सुरत - गुजरातमध्ये लॉकडाऊन काळात संचारबंदी असतानाही वडिलांची गाडी घेऊन बिनधास्त फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलास महिला पोलीस अधिकाऱ्याने चांगलाच धडा शिकवला. मात्र, या धाडसी कार्याबद्दल सुनिता यादव यांचे कौतुक करण्याऐवजी, त्यांना पुरस्कार देण्याऐवजी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलंय.

गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली. राज्यमंत्र्यांच्या मुलाने वडिलांच्या पॉवरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, लॉकडाऊन काळात वडिलांची नेमप्लेट असलेली गाडी घेऊन रस्त्यावर फिरत असल्यामुळे सुनिता यांनी त्यास चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर, थेट आरोग्यमंत्र्यांनाही सुनिता यांनी कायदा हा सर्वाना समान असल्याचे सांगत माझं कर्तव्य करत असल्याचे म्हटले. त्यामुळे, त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले.  संचारबंदी असतानाही मास्क न वापरता कारमधून 5 युवकांसह जात असलेल्या प्रकाश आणि त्याच्या मित्रांना सुनिता यादव यांनी अडवले होते. त्यावेळी, प्रकाशने सुनिता यांना वर्षभर याच ठिकाणी ड्युटी लावेल, अशी धमकी दिली. त्यामुळे, संतापलेल्या महिला पोलीस कॉन्टेबल सुनिता यांनी प्रकाशला खडे बोल सुनवाले. पोलिसांची वर्दी तुझ्या बापाची गुलामगिरी करण्यासाठी घातली नाही, असा सज्जड दमच यादव यांनी दिला. अखेर वरिष्ठांशी फोन झाल्यानंतर मी राजीनामा देईन, असे सांगून सुनिता यांनी वाद मिटवला. सध्या सोशल मीडियावर सुनिता यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसGujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी