राजस्थानमध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:49 AM2019-11-12T10:49:25+5:302019-11-12T10:53:05+5:30

राजस्थानमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Seven people died in accident in Bikaner | राजस्थानमध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

राजस्थानमध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देराजस्थानमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहे.मृतांमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

बिकानेर - राजस्थानमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील देशनोक येथे मंगळवारी (12 नोव्हेंबर) सकाळी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बिकानेरच्या पी. बी. एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.


 

Web Title: Seven people died in accident in Bikaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.