शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यज्ञावर सात कोटी स्वाहा

By admin | Updated: December 25, 2015 03:34 IST

तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे

हैदराबाद : तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या अभूतपूर्व अशा अच्युत महा चंडी यज्ञावर होणारा खर्च सात कोटी रुपयांच्या घरात आहे.मेडक जिल्ह्यातील इरावल्ली या गावातील आपल्या फार्म हाऊसवर राव यांनी या यज्ञाचे पौरोहित्य सात राज्यांतील ११०० पुजाऱ्यांकडे सोपविले. २३ डिंसेबरपासृन सुरू झालेली ही पूजा पाच दिवस चालणार आहे. मंत्रोच्चाराच्या घोषात यज्ञ सुरू आहे. दैनंदिन प्रार्थनाही या पुरोहितांकडून पार पाडल्या जात आहेत. राज्यावर दुष्काळाचे संकट असताना अशा प्रकारच्या पूजेवर उधळपट्टी करणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला असता या यज्ञासाठी राज्याच्या खजिन्यातून एकही पैसा खर्च झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. असा आहे भव्य मंडप....४० हजार चौरस फूट जागेवर बांबू आणि धानाच्या तणसापासून(काड्या) महा यज्ञशाळा उभारण्यात आली आहे. एकूण १०६ यज्ञकुंडांवर आहुती दिली जात आहे. सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११०० पुजारी ७०० मंत्र एकाचवेळी एकसूरात उच्चारत असल्यामुळे वातावरण भारावून गेले आहे. दुपारी ३.४५ पासून पुन्हा सुरू होणारा मंत्रोच्चार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालतो. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ असल्याचे सांगण्यात आले. स्वतंत्र तेलंगणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास महायज्ञ करण्याचा मानस राव यांनी चार वर्षांपूर्वी बोलून दाखविला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्राचे राज्यपाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, दोन केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे न्यायाधीशही महापूजेला उपस्थित राहणार आहेत.