कॅमेऱ्यासमोरच बळजबरी! महिला आमदाराने हात झटकला, तरी काँग्रेस नेत्याचा जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:33 IST2026-05-07T17:27:07+5:302026-05-07T17:33:13+5:30
केरळमध्ये काँग्रेस मुख्यालयाबाहेर महिला आमदारासोबत ज्येष्ठ नेत्याने अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

कॅमेऱ्यासमोरच बळजबरी! महिला आमदाराने हात झटकला, तरी काँग्रेस नेत्याचा जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
Congress Leader Cherian Philip: केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांच्या एका कृतीमुळे सध्या दक्षिणेतील राजकारण चांगलंच तापलं आहे. तिरुवनंतपुरम येथील केपीसीसी मुख्यालयाबाहेर पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या कोल्लमच्या आमदार बिंदू कृष्णा यांच्याशी फिलिप यांनी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते काँग्रेस मुख्यालयात दाखल होत होते. यावेळी बिंदू कृष्णा या देखील तेथे पोहोचल्या. व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, त्या सर्वांना हात जोडून नमस्कार करत पुढे जात होत्या. त्याच वेळी चेरियन फिलिप यांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
बिंदू कृष्णा यांनी तात्काळ फिलिप यांचा हात झटकला आणि त्यांना नको असे सांगत बाजूला ढकलले. मात्र, त्यानंतरही फिलिप थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा बिंदू कृष्णा यांचा हात पकडून त्यांना ओढण्याचा आणि मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे आमदार बिंदू कृष्णा अत्यंत अस्वस्थ दिसल्या आणि त्यांनी आपला हात बळजबरीने सोडवून घेत तिथून निघून जाणे पसंत केले.
A video from the Kerala Pradesh Congress Committee headquarters in Thiruvananthapuram has gone viral after Cherian Philip allegedly attempted to hug newly elected Kollam MLA Adv. Bindu Krishna despite her apparent reluctance during a legislative party meeting.
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) May 7, 2026
The viral video… pic.twitter.com/UhURpa80Qz
'नाही' म्हणजे 'नाही'च! सोशल मीडियावर संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चेरियन फिलिप यांच्यावर जोरदार टीका केली. सार्वजनिक ठिकाणी, जिथे शेकडो कॅमेरे आणि कार्यकर्ते होते, तिथे एका महिला लोकप्रतिनिधीसोबत असे वर्तन करणे कितीपत योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे. बिंदू कृष्णा या कोल्लमच्या आमदार असून त्यांनी अत्यंत संयमाने पण खंबीरपणे फिलिप यांच्या कृतीचा निषेध केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणवते. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.