शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा सील करण्यासाठी प्रति किमी ३५ कोटी खर्च

By admin | Updated: October 14, 2016 02:04 IST

भारत-पाकिस्तान सीमा डिसेंबर २०१८ पर्यंत ‘सील’ करण्याचा निर्णय महत्त्वाकांक्षी आहे. परंतु, हे काम व्यावहारिकदृष्ट्या परवडणारी आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी

हरीश गुप्ता / नवी दिल्ली

भारत-पाकिस्तान सीमा डिसेंबर २०१८ पर्यंत ‘सील’ करण्याचा निर्णय महत्त्वाकांक्षी आहे. परंतु, हे काम व्यावहारिकदृष्ट्या परवडणारी आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरमधील सीमा सील करण्यासाठी प्रति किलोमीटर ३५ कोटी रुपयांचा खर्च येईल.जम्मू-काश्मीरमधील सीमेची एकूण लांबी १,२२५ किलोमीटर आहे. यापैकी फक्त ८०० किलोमीटरचीच सीमा बंद करता येऊ शकते. उर्वरित सीमा सियाचीन, हिमनदी आणि हिमपर्वतात असल्याने ही सीमा उपग्रहामार्फतच सुरक्षित करता येऊ शकते. राजस्थान आणि पंजाबमधील सीमा बंद करण्यासाठी तुलनेत कमी खर्च येईल. या समितीच्या मते इलेक्ट्रॉनिक्स आणि लेसर तंत्रानेच सीमा पूर्णत: सुरक्षित राखता येऊ शकते. मधुकर गुप्ता समितीने सीमा सील करण्याची शिफारस केली होती. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यास यासाठी अंदाजे १ लाख कोटी रुपयांचा खर्च लागेल. सरकारने मात्र चालू आर्थिक वर्षासाठी फक्त २,००० कोटी रुपये मंजूर केले आहेत. इस्रायलची मॅगल कंपनी कॉन्ट्रॅक्टच्या स्पर्धेत...या कामाचे कंत्राट मिळविण्यास इस्रायलस्थित मॅगल सिक्युरिटी सिस्टिम्स ही कंपनी स्पर्धेत असल्याचे कळते. या कंपनीने गाझापट्टी आणि इस्रायलदरम्यानच्या हद्दीवर निगराणीसह तपासणी यंत्रणा उभारली आहे. तसेच पश्चिम किनाऱ्यावर टेहळणी आणि घुसखोरी तपास तंत्रप्रणाली उभारली आहे. या सीमासुरक्षा तंत्रप्रणालीचे वैशिष्ट्य असे की, या कुंपणाला कोणाचा स्पर्श झाल्यास तात्काळ धोक्याचा इशारा देणारा गजर होतो. राजनाथसिंह यांनाही ही प्रणाली आवडली आहे.