शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! ट्रक खराब होता, ट्रेन जवळ येत होती, बारा वर्षाच्या मुलाने दाखवला लाल शर्ट; मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:51 IST

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका १२ वर्षाच्या मुलाने लाल शर्ट फिरवून मोठा रेल्वे अपघात वाचवला.

पश्चिम बंगालमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाच्या दक्षतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा ट्रक खराब झाला होता आणि ट्रेन वेगात पुढे जात होती, तिथे असणाऱ्या एका मुलाने ट्रक खराब असल्याचे पाहिले आणि आपला लाल शर्ट काढला आणि फिरवू लगाला. समोर दिसलेलं लाल कपड पाहून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला, त्यामुळे मोठा अपघात टळला. आता या मुलाला रेल्वेकडून बक्षीसही देण्यात आले आहे. 

रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..."

या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील एका १२ वर्षाच्या मुलाने खराब झालेले रेल्वे ट्रॅक पाहून पॅसेंजर ट्रेनसमोर लाल शर्ट फिरवून मोठा अपघात होण्यापासून वाचवला आहे. या मुलाचे नाव मुर्सलीन शेख आहे, लोको पायलटने त्याचा सिग्नल पाहिला आणि योग्य वेळी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेक लावले. ही घटना  गुरुवारी भालुका रोड यार्डजवळ घडली. 

ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे म्हणाले, "एका १२ वर्षांच्या मुलाने मालदा ट्रेन थांबवण्यासाठी त्याने लाल शर्ट फिरवला, त्यामुळे लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला आणि पॅसेंजर ट्रेन थांबवली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक खराब झाल्यामुळे मुलाने हे केले.

पावसामुळे माती आणि खडे वाहून गेले होते. त्या ठिकाणी पोरीयनचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी म्हणाले, "नजीकच्या गावातील एका स्थलांतरित कामगाराचा मुलगा मुरसलीन शेख हा देखील रेल्वे कर्मचाऱ्यांसह यार्डात उपस्थित होता. पावसामुळे रुळाखालील भाग खराब झालेले पाहून त्या मुलाने समजूतदारपणा आणि सावधगीरी दाखवली. येणार्‍या पॅसेंजर ट्रेनच्या समोर त्याला लाल शर्ट फिरवला यामुळे लोको पायलटने ट्रेन थांबवली.

खराब झालेल्या ट्रॅकचा भाग दुरुस्त करण्यात आला आणि नंतर ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी या धाडसी मुलाला त्याच्या शौर्याबद्दल प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू यांच्यासह कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेंद्र कुमार यांनी मुलाच्या घरी पोहोचून त्याला बक्षीस दिले आणि त्याचे कौतुक केले.

टॅग्स :railwayरेल्वे