शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 10:08 IST

रेल्वे संरक्षण बला(RPF)नं ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

ठळक मुद्देरेल्वे संरक्षण बला(RPF)नं ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलागुन्हेगारी पद्धतीनं पैसे कमावण्यासाठी टोळीनं वेगवेगळे फंडे वापरल्याचं समजल्यानंतर तपास यंत्रणाही हैराण झाली आहे. या टोळीची सूत्रं दुबई, सिंगापूर आणि पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे.

नवी दिल्लीः रेल्वे संरक्षण बला(RPF)नं ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारी पद्धतीनं पैसे कमावण्यासाठी टोळीनं वेगवेगळे फंडे वापरल्याचं समजल्यानंतर तपास यंत्रणाही हैराण झाली आहे. या टोळीची सूत्रं दुबई, सिंगापूर आणि पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तसेच या पैशातून दहशतवाद्यांना निधी पुरवला जात असल्याचाही संशय आहे. या प्रकरणात गुलाम मुस्तफा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुलाम मुस्तफा 10 दिवसांपर्यंत तपास यंत्रणांच्या ताब्यात होता. या तपासात टोळीसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकासंदर्भात माहिती मिळाली आहे. एका गुन्हेगारी टोळीप्रमाणे हे लोक काम करत असल्याचंही उघड झालं आहे. गुलाम मुस्तफा हा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि टोळीशी संबंधित ग्राहकांना ते विकून टाकतो. याचे धागेदोरे प्रवाशांना तिकीट विकणाऱ्या एजंटांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. याच्या माध्यमातून आलेला पैसा वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केला जातो. पैसे जास्त झाल्यानंतर त्याचा क्रिप्टो करन्सींद्वारे वापर केला जातो. मोरक्या दुबईचा आणि सॉफ्टवेअर कंपनी सिंगापूरचीया टोळीचा म्होरक्या हा दुबईत राहत असून, अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. याचे धागेदोरे एक सॉफ्टवेअर कंपनीशी जोडलेले आहेत. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सिंगापूर पोलीस या सॉफ्टवेअर कंपनीचा तपास करत आहे. आरपीएफच्या डी. जी. अरुण कुमार यांनी सांगितलं की, या टोळीमध्ये सव्वा दोनशे लोक सामील आहेत. या टोळीशी संबंधित 28 लोकांना आरपीएफनं अटक केली आहे. गुलाम मुस्तफाच्या लॅपटॉपमधून अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही पूर्ण टोळी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून काम करत आहे. गुरुजी नावाचा एक मास्टर माइंड ही टोळी चालवतो. या टेरर फंडिंगचा संबंध तहरिक-ए-पाकिस्तानशीसुद्धा आहे. तसेच दुबई, पाकिस्तान, बांगलादेश आणि युगोस्लाव्हियापर्यंत या टोळीनं हातपाय पसलेले असून, ती दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय आहे. 

टॅग्स :Terrorismदहशतवादrailwayरेल्वे