Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 08:54 PM2022-12-29T20:54:02+5:302022-12-29T20:54:23+5:30

Road Accident in India: सीट बेल्ट न लावल्यामुळे 16,397 आणि हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोकांचा मृत्यू.

Road Accident in India: 4 lakh 12 thousand+ accidents in 2021; As many as 1 lakh 54 thousand+ people died | Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

googlenewsNext

Road Accident in India: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये 16,397 लोकांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 8,438 चालक आणि उर्वरित 7,959 प्रवासी होते. 'Road Accidents in India - 2021' नावाच्या या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोक रस्ते अपघातात मरण पावले, त्यापैकी 32,877 चालक आणि 13,716 प्रवासी होते. 2021 मध्ये एकूण 4,12,432 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,53,972 लोकांचा मृत्यू झाला तर 3,84,448 लोक जखमी झाले.

स्वतःच्या सुरक्षेत हलगर्जीपणा
रिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 93,763 लोक जखमी झाले तर सीट बेल्ट न लावल्यामुळे 39,231 लोक जखमी झाले. हेल्मेट आणि सीट बेल्ट यांसारखी सुरक्षा उपकरणे रस्ते अपघातात प्राणघातक आणि गंभीर इजा टाळतात. म्हणूनच सध्याच्या वाहतुकीच्या नियमांनुसार कारमध्ये सीट बेल्ट आणि दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, तर त्याचे चालान पोलिसांकडून कापले जाते. 

या राज्यात सर्वाधिक अपघात
राष्ट्रीय स्तरावर रस्ते अपघात मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. एकूण मृत्यू प्रकरणांपैकी 15.2 टक्के प्रकरणे फक्त उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत. 2020 मध्येही रस्ते अपघातातील मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर होता. रिपोर्टनुसार, 2021 मध्ये उत्तर प्रदेशानंतर तामिळनाडू (9.4 टक्के), महाराष्ट्र (7.3 टक्के) आणि राजस्थान (6.8 टक्के) आहे.

या कारणामुळे अपघात
रिपोर्टनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण अपघातांपैकी सुमारे 8.2 टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, लाल दिवा ओलांडणे आणि मोबाईल फोन वापरणे यामुळे झाले आहेत. म्हणूनच, या सर्व चुका टाळा आणि सुरक्षित प्रवास करा असे वारंवार सांगितले जाते. तरीदेखील अनेकजण नियम मोडताना आढळतात.

Web Title: Road Accident in India: 4 lakh 12 thousand+ accidents in 2021; As many as 1 lakh 54 thousand+ people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.