'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:37 PM2024-05-20T12:37:51+5:302024-05-20T12:59:12+5:30

तमिळनाडूमध्ये काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा इमारतीच्या बाल्कनीमध्ये अडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

Shocking news After 8 month old baby saved from falling Tamilnadu Mother End his life | 'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

Shocking News :तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वी बाल्कनीत प्लॅस्टिकच्या पत्र्यामध्ये अडकलेल्या एका मुलाला वाचवल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये काही लोक इमारतीखाली बेडशीट घालून उभे होते. काही लोकांनी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर चढून दोन मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाला वाचवले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील मुलगा बाल्कनीत बसवलेल्या प्लास्टिकच्या पत्र्यावर पडला होता. यानंतर ही लोक इमारतीच्या खाली बेडशीट घेऊन उभे होते. जेणेकरून मूल पडल्यास तो बेडशीटवरच पडेल.त्यावेळी लोकांनी खिडकीतून मुलाला वाचवले. महत्त्वाची बाब महिलेचे मूल चुकून तिच्या हातातून निसटून बाल्कनीत पडले होते. मुलाच्या या घटनेनंतर आईने रविवारी स्वतःचा जीव घेतला. आई-वडिलांच्या घरी एकटी असताना महिलेने आत्महत्या केली. प्राथमिक चौकशीअंती, ही महिला तिच्या मुलाशी संबंधित घटनेनंतर नैराश्यात गेली असावी असा पोलिसांना संशय आहे.

चिमुकल्याला शेजाऱ्यांनी नाट्यमयरित्या त्याला वाचवल्यानंतर रविवारी त्याच्या आई कोईम्बतूर येथे तिच्या पालकांच्या घरी मृत आढळून आली आहे.२८ एप्रिल रोजी, चेन्नईतील अवाडी येथील तिच्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेजाऱ्यांनी छताच्या खाली असलेल्या खिडकीतून चढून मुलाला वाचवले होते. मात्र रविवारी त्या मुलाची आई कोईम्बतूरमधील करमादई येथे तिच्या घरी मृतावस्थेत आढळली.

२८ एप्रिल रोजी झालेल्या या घटनेनंतर मुलाची आई व्ही.रम्याला अनेकांनी अपमानीत केलं होतं. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. त्यामुळे रम्या यातून सावरू शकली नव्हती आणि तेव्हापासून ती खूप दुःखी होती. रम्या चेन्नईतील एका आयटी फर्ममध्ये काम करत होती. तर तिचा पती व्यंकटेश हे देखील आयटी प्रोफेशनल आहेत. रम्या आणि तिचा नवरा आपल्या मुलासह दोन आठवड्यांपूर्वी करमाडाई येथील त्यांच्या  घरी आले होते. रविवारी रम्याला घरी एकटी सोडून तिचे आई-वडील एका कार्यक्रमाला गेले होते. मात्र, आई वडील घरी परतल्यानंतर रम्या त्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले पण उपयोग झाला नाही. रम्याचा आधीच मृत्यू झाला होता.

मुलगा चुकून हातातून निसटले आणि छतावर पडल्याने रम्या आधीच दु:खी होती. पण, व्हिडीओ व्हायरल होताच मुलाची काळजी घेण्याबद्दल रम्याला प्रचंड लाज वाटत होती. लोकांनी तिच्यावर तिने हे मुद्दाम केले असा आरोप लावला होता. इमारतीमधील रहिवाशांनी रम्याला आई म्हणून अपयशी असल्याचे असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे रम्या प्रचंड तणावात होती. दरम्यान, बाळाच्या आईच्या मृत्यूबद्दल गायिका चिन्मयी श्रीपादाने लोकांना फटकारले आणि या घटनेची लाज वाटल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Shocking news After 8 month old baby saved from falling Tamilnadu Mother End his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.