गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:20 AM2024-05-20T11:20:06+5:302024-05-20T11:50:12+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. मराठी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने मतदानाचा हक्क बजावला असून फोटो शेअर करत लिहिले की, आज मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. तुम्ही मतदान केलं का?

अभिनेत्री अदिती सारंगधर हिनेदेखील मतदान केले आहे.

अभिनेता गौरव मोरेने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया…

अभिनेता सुनील बर्वेने कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे आणि तिने चाहत्यांना तुम्ही मतदान केले का, असेही विचारले.

सुकन्या मोनेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, मी माझा मतदानाचा अधिकार बजावून आले,तुम्ही ही केलेत ना मतदान?

मनोज जोशींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पहिल्यांदाच मतदान केले आहे.

वीणा जामकरनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे आणि तिने चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सुखदा खांडकेकर हिनेदेखील मतदान केले आहे.

सायली संजीवने देखील मतदान केले.

उमेश कामत आणि प्रिया बापटने मतदानाचा हक्क बजावला असून उमेशने दोघांचे फोटो शेअर करत लिहिले की, मी माझं कर्तव्य पार पाडलंय. तुम्ही ?

उदय टिकेकर आणि स्वानंदी टिकेककरनेदेखील मतदानाचा हक्क बजावला.

बेर्डे फॅमिली म्हणजे प्रिया बेर्डे, अभिनय आणि स्वानंदी बेर्डेदेखील मतदान केले.

ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

वनिता खरातने केले मतदान

अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील मतदानाचा हक्क बजावला.

आई कुठे काय करते मधील संजना उर्फ रुपाली भोसलेनेदेखील कुटुंबासोबत मतदान केले.