शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पँट काढली, मुळव्याधीच्या शस्त्रक्रियेचा पुरावा दाखवला, तरीही लोको पायलटला रजा नाकारली, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:07 IST

Indian Railway News: मुळव्याधीची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही एका लोको पायलटला वैद्यकीय रजा नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या लखनौ विभागातून समोर आला आहे.

मुळव्याधीची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही एका लोको पायलटला वैद्यकीय रजा (सिक लीव्ह) नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या लखनौ विभागातून समोर आला आहे. रजा नाकारण्यात आल्याने वैतागलेले लोको पायलट राजेश मीणा यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पँट काढून शस्त्रक्रियेचा पुरावाही दाखवला. या घटनेचा व्हिडीओ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत असून, याबाबत रेल्वे कर्मचारी संघटननांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोशिएशन (एआयएलआरएसए) च्या नेत्यांनी सांगितलेकी, राजेश मीणा हे अनुसूचित जमातीमधील आहेत. त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये मुळव्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यांना २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सुट्टी देण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेमुळे झालेली जखम पूर्णपणे बरी न झाल्याने त्यांनी रेल्वेच्या हेल्थ युनिटकडे निर्धारित प्रक्रियेनुसार सुट्टी वाढवण्याची विनंती केली होती. डॉक्टरांनी मीणा यांची तपासणी केल्यानंतर त्यांची रजा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सिक मेमो आणण्यास सांगितले.

राजेश मीणा यांनी आधी क्रू कंट्रोलर आणि नंतर चीफ क्रू कंट्रोलर रतन कुमार यांच्याशी संपर्क साधला. मात्र मीणा यांनी आपली वैद्यकीय कागदपत्रे, लॅब रिपोर्ट आणि शस्त्रक्रियेच्या जखमेवरील ड्रेसिंग दाखवली, मात्र त्यांना रजा नाकारण्यात आली. त्यामुळे अखेरीस राजेश मीणा यांनी वैतागून आपले कपडे उतरवले, असा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे. त्यानंतर एका युनियनच्या नेत्याने या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप केल्यानंतर मीणा यांना आराम करण्यासाठी रजा देण्यात आली.

या प्रकाराबाबत एआयएलआरएसएचे सरचिटणीस के. सी. जेम्स यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एका लोको पायलटला वैद्यकीय रजेसाठी या पातळीपर्यंत जावं लागलं, ही बाब लाजीरवाणी आहे. यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारावई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाच्या विभागीय व्यववस्थापकांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Loco Pilot Forced to Show Surgery Scar for Sick Leave

Web Summary : Railway loco pilot Rajesh Meena, denied sick leave after hemorrhoid surgery, showed his scar to superiors in Lucknow. Union leaders demand action after the incident sparked outrage among railway employees.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेEmployeeकर्मचारी