शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

"संघानं सांगितलं तर पद सोडायला तयार...!", RSS च्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं मोठं विधान; काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 19:42 IST

भागवत म्हणाले, संघाने आधीपासूनच ठरवले आहे की, संपूर्ण समाजाला संघटीत करण्याशिवाय, संघाला आणखी कुठलेही काम करायचे नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबई येथे आयजित संघाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात विविध विषयांवर आपली मते मांडली. दरम्यान, त्यांनी निवृत्तीसंदर्भातील एका प्रश्नावरही भाष्य केले. वयाची अट असूनही संघाने त्यांना काम सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे त्यांनी यावेली सांगितले. मात्र, ज्या क्षणी संघ त्यांना पद सोडण्यास सांगेल, त्या क्षणी आपण पदमुक्त होऊ, असेही भागवत यांनी यावेली स्पष्ट केले.

मोहन भागवत म्हणाले, "संघाचे काम प्रचार करणे नाही, तर समाजात संस्कार रुजवणे आहे. प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धीने अहंकार निर्माण होतो. यामुळे प्रसिद्धी ही योग्य वेळी आणि मर्यादित स्वरूपात असावी. एवढेच नाही तर, "संघ हा आपल्या स्वयंसेवकाकडून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करून घेतो आणि संघाच्या इतिहासात आतापर्यंत कुणालाही जबरदस्तीने निवृत्त करण्याची वेळ आलेली नाही," असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ७५ वर्षांनंतर पद सोडण्याची परंपरा असल्याचे बोलले जाते. तसेच, सरसंघचालक कोण होऊ शकते? यासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, "सरसंघचालक पदासाठी क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्राह्मण असणे ही पात्रता नाही, तर जो हिंदू संघटनेसाठी कार्य करतो, तोच सरसंघचालक बनतो. संघाचे हे पद सर्वोत्तम उमेदवारालाच मिळते." तसेच, सरसंघचालक पदासाठी कुठलीही निवडणूक होत नाही. सर्वसाधारणपणे बोलले जाते की, वयाच्या 75 वर्षांनंतर कुठल्याही पदाशिवाय काम करायला हवे.

भागवत म्हणाले, संघाने आधीपासूनच ठरवले आहे की, संपूर्ण समाजाला संघटीत करण्याशिवाय, संघाला आणखी कुठलेही काम करायचे नाही. 

देशात चार प्रकराचे हिंदू - 
तत्पूर्वी कालच्या सत्रात बोलताना भागवत म्हणाले होते, "भारतातील मुस्लीम आणि ख्रीश्चन, हे इतर देशातील मुस्लीम आणि ख्रिश्ननांप्रमाणे नाहीत. त्यांचे वेगळेपण कुठूण आले? ते भारतीय आहे." भागवत पुढे म्हणाले, "यामुळेच तर आम्ही म्हणतो, की चार प्रकारचे हिंदू आहेत. आणखी तर कुणी नाहीत. एक आहेत, 'गर्व सें कहों हम हिंदू है.' दुसरे आहेत, आहोत आम्ही हिंदू आणि राहूत, गर्व वैगेरे कशाला, असतात लोक, आम्हीही आहोत, राहू. तिसरे आहे. 'जोरसे मत बोलो हम हिंदू है,' घरात येऊन विचाराल तर सांगू, बाहेर सांगणार नाही, आहेत त्यांची काही कारणं. आणि चौथे म्हणजे, जे विसरले आहेत. ज्यांना, विसर पाडला गेला, त्यांनी विस्मृतीतच रहावे, अशी व्यवस्था असते. तसे करणारे लोक असतात. आणखी लोकांनी विसरावे आणि तिकडे सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

"कारण भारत मोठा झाला, तर जगातील काही स्वार्थी शक्तींच्या स्वार्थाचे दुकान बंद हईल. यामुळे सर्व जण आपल्याशी मैत्रीही करत आहेत आणि वेळो वेळी शत्रूत्वही दाखवतात. या सर्वांचा उपाय म्हणजे सामर्थसंपन्न राष्ट्र. त्यासाठी संघटित, गुणवान समाज असावा लागतो," असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले." 

English
हिंदी सारांश
Web Title : Ready to Resign if RSS Says So: Mohan Bhagwat

Web Summary : Mohan Bhagwat stated he's ready to resign if the RSS asks. He emphasized the importance of instilling values over publicity and highlighted that the RSS doesn't force retirement. He also spoke about inclusivity in selecting a successor and uniting society.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ