Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:56 PM2020-07-15T13:56:19+5:302020-07-15T14:10:28+5:30

Rajasthan Political Crisis: भाजपामध्ये जाणार नसल्याचा पायलट यांच्याकडून पुनरुच्चार; पायलट यांना काँग्रेसकडून साद

Rajasthan Political Crisis congress trying to bring back rebel leader sachin pilot | Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

Next

जयपूर: पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केले आहेत. पायलट यांच्यासाठी पक्षानं दरवाजे बंद केलेले नाहीत, अशा शब्दांत राजस्थानकाँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी पायलट यांना साद घातली आहे. काँग्रेसनं कालच पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. या कारवाईनंतरही पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसनं त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. (Rajasthan Political Crisis)

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी ट्विट करून पायलट यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. देवानं त्यांना सद्भुद्धी द्यावी आणि त्यांना त्यांची चूक लक्षात यावी. भाजपाच्या जाळ्यातून त्यांनी बाहेर यावं, अशी माझी प्रार्थना आहे', असं पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेस पायलट यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट झालं आहे. 



मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची काल काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. 

'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावरील कारवाईची माहिती दिली.

राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

Web Title: Rajasthan Political Crisis congress trying to bring back rebel leader sachin pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.