शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! गुजरातमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक; राजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:52 IST

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला आहे. अपघातात राजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला आहे. अमीरगड तालुक्यातील इक्बालगड गावाजवळ पालनपूर-आबू रोड हायवेवर झालेल्या अपघातातराजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानकडून येणारा एक ट्रक भरधाव वेगात होता. अचानक ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक डिव्हायडर तोडून चुकीच्या दिशेने गेला. याच दरम्यान समोरून येणाऱ्या कारची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं प्रचंड नुकसान झालं.

अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण १० प्रवासी होते. धडक बसल्यानंतर ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघातानंतर पालनपूर-आबूरोड हायवेवर दोन्ही बाजूंनी सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने ट्रक आणि कार बाजूला केली, त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

बनासकांठाचे पोलीस अधीक्षक प्रशांत सुंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक डिव्हायडर ओलांडून चुकीच्या दिशेने आला होता. ट्रकच्या धडकेमुळे कारमधील ७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत. सर्व मृत राजस्थानच्या पाली आणि सिरोही जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic Accident in Gujarat: Truck Collides with Car, 7 Dead

Web Summary : A horrific accident in Gujarat's Banaskantha district claimed seven lives from Rajasthan. A speeding truck crossed the divider and collided head-on with a car, leaving three others critically injured. The accident caused a major traffic jam, and police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातGujaratगुजरातRajasthanराजस्थानDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी