शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे - काँग्रेसच्या कार्यकारी समितीची मागणी

By admin | Updated: November 7, 2016 17:45 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारून पक्षाचा कारभार आपल्या हाती घ्यावा, अशी मागणी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारून पक्षाचा कारभार आपल्या हाती घ्यावा, अशी मागणी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केली. दरम्यान, आज झालेल्या बैठकीस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आजारपणामुळे अनुपस्थित राहिल्याने कार्यकारी समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी भुषवले होते.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला आणि ए.के.अँटोनी यांनी बैठकीत झालेल्या घडामोडींविषयी माहिती दिली. तसेच सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी मुदतवाढ देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
आज झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी राहुल यांनी आता पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती केली. राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी हीच योग्यवेळ आहे, असे अँटोनवी म्हणाले.  त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यकारी समितीमधील सर्वच सदस्यांनी राहुल यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली. तसेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन  यासंदर्भात त्यांना माहिती द्यावी, असाही निर्णय कार्यकारी समितीने घेतला. 
दरम्यान, कार्यकारी समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवला.   मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेची नशा झाली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला.