शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:03 IST

काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात केली आहे.सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे.सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी - सोनिया गांधी

नवी दिल्ली : लॉकडाउच्या मुद्यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर ट्रिपल अॅटॅक केला.

काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 

सरकार समजून घ्यायलाच तयार नाही -सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे. गरीब, मजूर, छोटे व्यापारी आणि शेतकरी चिंतित आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांना होणारा त्रास अनुभवत आहे. मात्र, सरकारवर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. आम्ही सरकारला वारंवार सूचना केल्या मात्र, सरकार समून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता काँग्रेसने भारताचा आवाज उंचावण्याचा विडा उचलला आहे. सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी.’

40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

सरकारने गरिबांच्या बँक खात्यात पुढील 6 महिने 7,500 रुपये टाकायला हवेत. मनरेगाअंतर्गत वर्षाला 100 दिवसांऐवजी 200 दिवस काम द्यायला हवे. एमएसएमई क्षेत्रासाठी तत्काळ निधीची घोषणा करण्यात यावी. तसेच सरकारने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचीही व्यवस्था करावी, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.

गरिबांचे नुकसान - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "मजुरांना भुकेल्यापोटी हजारो किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. देशाला मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे उद्योग धंदे एका पाठोपाठ एक बंद होत आहेत. भारताला कर्जाची आवश्यकता नाही. आज देशाला पैशांची आवश्यकता आहे. गरीब जनतेला पैशांची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेस सरकारसमोर चार मागण्या ठेवत आहे."

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न -काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी म्हणाल्या, "गरिबांच्या खात्यात तत्काळ 10 हजार रुपये टाकले गेले पाहीजे. मी विषेश करून भाजपाला सांगते, की राजकारण करू नका. ही वेळ सर्वांनी मिळून गरिबांना साथ देण्याची आहे. विचारधारा बाजूला ठेवण्याची आहे. उत्तर प्रदेश सरकारने बसेसवरून राजकारण केले. महाराष्ट्रात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील जनता त्रस्त आहे. सरकार त्यांना मदत करत नाहीये. आम्ही मानवतेच्या आधारावर ही मागणी करत आहोत. आपण सर्वांनीच या दुःखाच्या प्रसंगात त्यांची साथ द्यायला हवी.’

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

 

टॅग्स :congressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या