Jammu and kashmir Major car-borne IED attack averted by security in pulwama sna | Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

ठळक मुद्देयासंदर्भात आता एनआयए पुढील तपास करणार आहे. लवकरच एनआयएचा चमू या भागाचा दौरा करेल.या गाडीत मोठ्या प्रमाणावर आयईडी होते, असे सांगण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार, यासंदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासूनच माहिती मिळत होती.

पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात संरक्षण दलाला गुरुवारी मोठे यश आले. येथे एका कारमध्ये आयईडी असल्याची माहिती संरक्षण दलाला मिळाली होती. यानंतर संरक्षण दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत कार ताब्यात घेतली आणि त्यामधील आयईडी डिफ्यूज केले. यामुळे पुलवामा सारख्या मोठ्या हल्ल्याची पुनरावृत्ती टळली आहे. या गाडीत मोठ्या प्रमाणावर आयईडी होते, असे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार, यासंदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासूनच माहिती मिळत होती. काही नाक्यांवर संबंधित सॅन्ट्रो कार थांबली नव्हती. यामुळे शंका अधिक बळावली. याशिवाय आयईडी असल्याचीही माहिती मिळाली होती. त्यामुळे मोठ्या  प्रमाणावर सतर्कता वाढविण्यात आली होती. यासंदर्भात आता एनआयए पुढील तपास करणार आहे. लवकरच एनआयएचा चमू या भागाचा दौरा करेल.

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज

ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो भारतीय जवानांनी उधळून लावला.

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएसह इतर संरक्षण दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. संबंधित गाडी दक्षीण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रजपुरा रोडजवळ अडवण्यात आली. यानंतर बॉम्ब डिस्पोझल स्क्वॅयडला पाचारण करण्यात आले. यावेळी गाडीजवळील परिसर आणि घरे रिकामी करण्यात आली होती. आयईडी डिफ्यूज केल्यानंतर एक छोटा स्फोट झाला. यात केवळ गाडीचेच नुकसान झाले आहे.

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jammu and kashmir Major car-borne IED attack averted by security in pulwama sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.