A major incident of a vehicle-borne IED blast averted by the timely input and action by Pulwama rkp | पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज

ठळक मुद्देपुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि लष्काराच्या जवानांनी यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. या कारमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दहशतवादी पुलवामाजवळ एका सॅन्ट्रो कारमध्ये IED स्फोटकं भरून घेऊन जात असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाने लगेच कारवाई करत कार ताब्यात घेतली आणि त्यामधील IED डिफ्यूज केले. त्यामुळे पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. 

पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि लष्काराच्या जवानांनी यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. या कारमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही कार पकडण्यात आली.

या पांढर्‍या सॅन्ट्रो कारमध्ये दुचाकी नंबर प्लेट होती, ती कठुआमध्ये नोंदली गेली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचा तपास केला. त्यानंतर बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब विल्हेवाट युनिट म्हणण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला.

यातच असे सांगितले जात आहे की, सुरुवातील कारतून जवानांवर तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र काहीवेळानंतर हा दहशतवादी कार सोडून फरार झाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी NIA करणार आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला अशाच प्रकारे होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी कारमध्येच बॉम्ब ठेवले आणि कारसह सीआरपीएफच्या ताफ्यात घुसले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ४५ जवान शहीद झाले होते.

आणखी बातम्या...

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना

Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा

धक्कादायक! पॅरोलवर सुटल्यानंतर काही तासांत आरोपीचा खून

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A major incident of a vehicle-borne IED blast averted by the timely input and action by Pulwama rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.