Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:39 AM2020-05-28T10:39:13+5:302020-05-28T10:39:41+5:30

Corona News in Sindhudurg : रविवारी एकदम ८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा १६ वर पोहोचला होता.

Corona News in Sindhudurg: Two more Corona affected in Sindhudurg district rkp | Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोना बधितांची संख्या १९ झाली आहे. यातील एक रुग्ण कणकवली तालुक्यातील असून तो कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर दुसरा वैभववाडी तालुक्यातील आहे. या दोघांचेही रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आले आहेत. दोन्ही रुग्णांनी  मुंबई येथून प्रवास केला आहे. या दोन्ही व्यक्ती अलगीकरणात होत्या.

रविवारी एकदम ८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा १६ वर पोहोचला होता. त्यानंतर सोमवारी पणदूर येथे ५२ वर्षीय महिला पोसिटीव्ह निघाली होती. दोन दिवसांच्या कालावधीत नंतर आज दोन रुग्ण पोसिटीव्ह निघाले. त्यामुळे हा आकडा १९ वर पोचला आहे. तर ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात ४५ हजाराहून चाकरमानी दाखल झाले आहेत. तर २०० पेक्षा जास्त अहवाल अद्यापही येणे बाकी आहेत.
 

Web Title: Corona News in Sindhudurg: Two more Corona affected in Sindhudurg district rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.