शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:23 IST

NCP SP MP Supriya Sule In Parliament Winter Session 2025: शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीसंदर्भात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सुप्रिया सुळे यांनी संसदेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

NCP SP MP Supriya Sule In Parliament Winter Session 2025: राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिला. दुबार मतदारांमुळे गाजलेल्या निवडणुकीचा 'दुबार' निकाल टळला. अनेक ठिकाणी 'दुबार' मतदारांमुळे मतदानावेळी गोंधळ उडाला. राज्यात दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ४७.५१ टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानावेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद संसदेत उमटले. संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडत महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली.

महाराष्ट्रात मंगळवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की, प्रचंड मारामाऱ्या, बंदुका दाखवणे आणि एवढा सगळा गोंधळ या निवडणुकीत झाला. असे याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेले नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.

शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही

कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मदतीचा जो प्रस्ताव होता तो अद्याप महाराष्ट्र सरकारने दिला नाही. यावर, खरे तर हे दुर्देव आहे की, सत्तेत येताना महायुतीमधील नेते वारंवार सांगत होते की, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदत करू. पण आता तसे होताना दिसत नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला माझी विनंती आहे की, महाराष्ट्रात झालेला हा सर्व सावळा गोंधळ पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला विनंती करावी की, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव तातडीने घ्यावा. कारण शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, मतमोजणी २१ डिसेंबरला असल्याने मतदान यंत्रे १९ दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश आयोगाने दिले. उमेदवारांच्या मनात शंका राहू नये, यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पहारा देण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या गोदामाच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. गोडाऊन बाहेर सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. आवश्यक तिथे बॅरेकेटींग करावे, गोदामाच्या ठिकाणी केवळ अधिकृत व्यक्तींनाच लॉगबुकमध्ये नोंद करून प्रवेश देण्यात यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Elections Echo in Parliament; Supriya Sule Criticizes Maharashtra Government

Web Summary : Supriya Sule raised concerns in Parliament about irregularities during Maharashtra's municipal elections, citing violence and voter fraud. She criticized the state government for neglecting farmers' welfare and urged central intervention for pending aid.
टॅग्स :ParliamentसंसदSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरीLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक