शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:34 IST

सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

बिजापूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात बुधवारी (3 डिसेंबर) भीषण चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद आणि एक जखमी झाला आहे. ही कारवाई पश्चिम बस्तर डिव्हिजनच्या जंगलात सुरू असून, अद्यापही अधून-मधून गोळीबार सुरू असल्यामुळे मृत माओवादींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्च ऑपरेशनदरम्यान अचानक चकमक

सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती की, बिजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमले आहेत. या माहितीच्या आधारे DRG, STF आणि CRPF-ची कोब्रा बटालियन यांचे संयुक्त पथक सर्च ऑपरेशनसाठी रवाना झाले. पथक जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला.

सुरक्षा दलांच्या जवानांनीही प्रतिउत्तर दिले, ज्यात 5 माओवादी ठार झाले. बीजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, बिजापूर-दंतेवाडा सीमेजवळील गंगालूर परिसर कुख्यात माओवादी कमांडर पापारावच्या नियंत्रणाखालील मानला जातो. 

16 दिवसांपूर्वी हिडमाचा अंत 

या चकमकीला विशेष महत्त्व आहे, कारण 18 नोव्हेंबरला टॉप नक्षल नेता माडवी हिडमा आंध्र पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला होता. हिडमावर 1 कोटी रुपयांहून अधिक इनाम जाहीर होते. तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावचा रहिवासी आणि नक्सल चळवळीचा महत्त्वाचा लष्करी चेहरा होता.

नक्षलविरोधी मोहिमेला वेग

बस्तर रेंजमध्ये नक्षलविरोधी कारवाया सध्या वेगाने सुरू आहेत. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद निर्मूलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात संयुक्त कारवायांची तीव्रता वाढवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Encounter in Bijapur: 7 Naxalites Killed, 2 Soldiers Martyred

Web Summary : A fierce encounter in Chhattisgarh's Bijapur district resulted in the death of 7 Naxalites and the loss of 2 soldiers. The operation continues in the West Bastar forests, following intelligence about a large Maoist gathering. Naxal operations are intensified after a top Naxal leader was killed recently.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड