शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra :'मी गुलाम नबी आझाद यांची माफी मागतो; दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी सहमत नाही'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:11 IST

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकचा पुरुवा मागितला आहे.


Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. पण, राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याचे म्हटले आहे. 'दिग्विजय सिंह जे बोलले त्याच्याशी मी सहमत नाही. माझा लष्करावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय लष्कर कोणतेही ऑपरेशन करण्यास सक्षम आहे, त्याचा पुरावे देण्याची गरज नाही' असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

काय म्हणाले दिग्विजय सिंह?
दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला होता. 'पुलवामामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. तेव्हा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती, पण मोदींनी ते मान्य केले नाही. आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावाही दाखवला नाही,' असे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते.

हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक विधान 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान राहुल गांधी यांना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. माझा देशाच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे.'

गुलाम नबींची माफी मागितली
एवढंच नाही तर राहुल यांनी यावेळी काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची माफीही मागितली. भारत जोडो यात्रेसाठी गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित न करण्याबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, 'गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातील बहुतांश लोक आमच्यासोबत बसले होते. 90 टक्के लोकांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. त्या बाजूला फक्त गुलाम नबी राहिले आहेत. मी गुलाम नबी आझाद यांचा आदर करतो. माझ्यामुळे त्यांना दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागतो.' गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आता त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेस