शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:01 IST

गेल्या काही वर्षात विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने विजय मिळवला आहे. पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आपली विश्वासार्हता जपता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचाही दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र काँग्रेस या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करू शकली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निकालाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाची पायाभरणी झालेल्या मुंबई शहरातच पक्षाची कामगिरी सर्वात वाईट ठरली आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी काँग्रेसला केवळ ३ जागा जिंकता आल्या आहेत. महाराष्ट्रात ७५ जागा अशा होत्या जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती. तेथेही बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. ७५ पैकी ६५ जागांवर काँग्रेस पराभूत झाली आहे.

दुसरीकडे, निकाल आल्यापासून पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पराभवासाठी  नेतृत्वाला जबाबदार धरले. "आमचे नेतृत्व वाईट आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्या आत्मविश्वासाने प्रवेश केला होता, त्यावरून निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे दिसून येत होते, परंतु पक्षाच्या या अतिआत्मविश्वासानेच तो उतरवला. दुसरीकडे, भाजप नेते मैदानात उतरले आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनेक जागा गमावल्या. राजस्थान विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाने गेल्या वर्षी जिंकलेल्या तीन जागांपैकी तीनही जागा गमावल्या. त्याचप्रमाणे पंजाब पोटनिवडणुकीत जिंकलेल्या तीन जागाही गमावल्या. तर पंजाब, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. त्याचबरोबर कर्नाटकातील तीन आणि केरळमधील एका जागेवरही विजय मिळाला आहे. 

लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त या वर्षी झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या ६२ विधानसभा निवडणुकांपैकी काँग्रेसचा ४७ निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तर काँग्रेसला केवळ १५ निवडणुका जिंकता आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे झालेल्या ४० विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने फक्त ७ निवडणुका जिंकल्या होत्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे