शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

'तो' मेलेला उंदीर तब्बल 10 तास पोलीस प्रोटेक्शनमध्ये होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:12 IST

डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे.

ठळक मुद्देडोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. दिल्लीतील गोविंदपूरी परिसरातून रात्री साडे बारा वाजता पीसीआरमध्ये एक कॉल आला.पोलिसांनी जवळपास 10 तास मेलेल्या उंदीर असलेल्या घराबाहेर पहारा दिल्याची माहिती समोर आली.

नवी दिल्ली - डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. दिल्ली पोलिसांना रात्री साडे बाराच्या सुमारास एक फोन आला. यामध्ये एका खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंध येत असल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र या प्रकरणाचा तपास करताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गोविंदपूरी परिसरातून रात्री साडे बारा वाजता पीसीआरमध्ये एक कॉल आला. या कॉलवर खालच्या मजल्यावर असणाऱ्या बंद खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंध येत असल्याची तसेच भाडेकरू गायब असल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेजाऱ्यांनी भाडेकरू काही दिवसांपासून गायब असून घराला कुलूप लावण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं. 

पोलिसांनी घर मालकाचा नंबर घेऊन त्याला फोन केला. मात्र त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. पोलिसांना याप्रकरणी शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी घरमालक आणि भाडेकरू काही दिवसांपासून गायब असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी सकाळपर्यंत वाट पाहायची त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. त्यामुळेच दुर्गंध येत असलेल्या त्या बंद खोलीबाहेर जवळपास 10 तास पोलिसांनी कडक बंदेबस्त ठेवला. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पोलिसांनी स्थानिक फॉरेन्सिक टीमलाही तपासासाठी घटनास्थळी बोलावले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अखेर घरमालकाशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने काही दिवसांपूर्वी भाडेकरू घर सोडून गेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरमालकाला चावी घेऊन बोलावलं. कुलूप उघडून पोलिसांनी खोलीमध्ये तपास केला. पण त्यावेळी पोलिसांना समोर मेलेला एक उंदीर सापडला. काही दिवसांपासून उंदीर घरामध्ये मरून पडल्याने प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलिसांनी जवळपास 10 तास मेलेल्या उंदीर असलेल्या घराबाहेर पहारा दिल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी घरमालकाला घराची स्वच्छता करण्याची सूचना दिली आहे. 
 

 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस