शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

5 कोटींच्या गाडीचे पोलिसांनी कापले 5 हजारांचे चालान, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:34 AM

पोलिस लॅम्बोर्गिनी कारचे चालान कापत होते, तेव्हा रस्त्यावर कारला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

जयपूर: अमेरिका-दुबईसारख्या देशांमध्ये सुपरकार अनेकदा पाहायला मिळतात. पण, भारतात अशाप्रकारच्या कार क्वचितच दिसतात. अशी एखादी सुपर कार दिसल्यावर बघ्यांची गर्दी जमते. जयपूरमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. जयपूरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी चालान कापण्यासाठी एका सुपर कारला थांबवले. ही कार थांबताच तिला पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा नंबर प्लेन नसलेली 5 कोटींची लॅम्बोर्गिनी कार चालवत होता. यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडले आणि 5 हजार रुपयांचे चालान कापले. घटनास्थळी तैनात हेड कॉन्स्टेबल सुलतान सिंग यांनी मोटार व्हेईकल अॅक्टनुसार चालान कापले आणि त्या तरुणाला गाडीला नंबर प्लेन लावून घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रस्त्यावर थांबलेली सुपर कार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली.

रस्त्यावर ट्रॅफिक जामपोलिस चालान कापण्यात व्यस्त होते, यादरम्यान 5 कोटींची ही आलिशान कार पाहण्यासाठी आणि कारसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले. चालनादरम्यान गाडी 15 मिनिटे रस्त्यावर उभी राहिली आणि यादरम्यान फोटो काढणाऱ्यांच्या गर्दीमुळे रस्ता जाम झाला. यानंतर वाहतूक पोलिसांनी लोकांना तेथून हटवले. दरम्यान, ही 5 कोटींची कार राष्ट्रीय नेमबाज आणि जयपूरचे उद्योगपती विवान कपूर यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलLamborghiniलँबॉर्घिनी