पीएनजी ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडर नाही; गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:45 IST2026-03-16T10:45:28+5:302026-03-16T10:45:50+5:30

यासंदर्भात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने १४ मार्चला अधिसूचना काढत, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येणाऱ्या ‘द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण नियमन) आदेश- २०००’ मध्ये सुधारणा केली आहे. ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना घरगुती एलपीजी जोडणी त्वरित परत करणे अनिवार्य केले आहे. 

PNG consumers no longer have LPG cylinders; Center imposes restrictions in the wake of gas cylinder shortage | पीएनजी ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडर नाही; गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्बंध

पीएनजी ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडर नाही; गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्बंध

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने ‘पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस’ (पीएनजी) कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना अनुदानित एलपीजी सिलिंडर ठेवण्यास किंवा नव्याने खरेदी करण्यास बंदी घातली आहे. तसेच गॅस पुरवठ्यावर आलेला ताण कमी करण्यासाठी पीएनजीच्या विस्ताराला गती देण्याचे निर्देश नियामक संस्थांना केंद्र सरकारने दिले आहेत. 

यासंदर्भात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने १४ मार्चला अधिसूचना काढत, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येणाऱ्या ‘द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण नियमन) आदेश- २०००’ मध्ये सुधारणा केली आहे. ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना घरगुती एलपीजी जोडणी त्वरित परत करणे अनिवार्य केले आहे. 

...तर एलपीजी कनेक्शन ठेवता येणार नाही
एकाच वेळी पीएनजी आणि घरगुती एलपीजी हे दोन्ही कनेक्शन असणाऱ्या व्यक्तीला घरगुती एलपीजी कनेक्शन कायम ठेवता येणार नाही. यासोबतच दोन्ही कनेक्शन असल्यास कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्याच्या वितरकांमार्फत एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेता येणार नाही.

अशा व्यक्तींनी त्यांच्याकडील घरगुती एलपीजी कनेक्शन त्वरित रद्द करणे आवश्यक असल्याचे सरकारी तेल कंपन्या व त्यांच्या वितरकांना मंत्रालयाने  दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

Web Title : पीएनजी उपभोक्ताओं को एलपीजी सिलेंडर नहीं, आपूर्ति पर चिंता।

Web Summary : वैश्विक ऊर्जा संकट के कारण केंद्र सरकार ने पीएनजी उपभोक्ताओं के लिए एलपीजी सिलेंडर सीमित किए। पीएनजी का विस्तार तेज किया गया। पीएनजी उपलब्ध होने पर एलपीजी कनेक्शन सरेंडर करना होगा।

Web Title : No LPG cylinders for PNG users amidst supply concerns.

Web Summary : Central government restricts LPG cylinders for PNG users due to global energy crisis. PNG expansion is accelerated. Existing LPG connections must be surrendered if PNG is available.