शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 20:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे...

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) - कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (सीएसटीओ)च्या आउटरीच शिखर सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या घडामोडींचा भारतासारख्या शेजारील देशांवर सर्वाधिक परिणाम होईल, असे मोदींनी म्हटले आहे. म्हणूनच, या मुद्द्यावर प्रादेशिक फोकस आणि सहकार्याची आवश्यकता आहे. एवढेच नाही, तर  जागतिक समुदायाने एकत्रितपणे आणि योग्य विचारविनिमय करून नव्या प्रणालीच्या मान्यतेवर निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच, यासंदर्भात भारताचा संयुक्त राष्ट्राला पाठिंबा आहे, असेही मोदी म्हणाले. (PM Narendra Modi says neighboring nations like india have been affected by Afghanistan) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पहिला मुद्दा असा, की अफगाणिस्तानातील शासन बदल सर्वसमावेशक नाही आणि ते कुठल्याही संवादाशिवाय झालेले आहे. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानात अस्थिरता आणि कट्टरतावाद कायम राहिला, तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारेला उत्तेजन मिळेल. इतर अतिरेकी गटांना हिंसाचाराच्या माध्यमाने सत्ता मिळविण्याचे प्रोत्साहनही मिळू शकते.

कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

मोदी म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये ड्रग्ज, अवैध शस्त्रे आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढू शकते. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे राहिली आहेत. यामुळे, संपूर्ण प्रदेशातच अस्थिरतेचा धोका राहील. त्यांनी भयंकर मानवी संकट हा चौथा सर्वात मोठा मुद्दा, असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, आर्थिक आणि व्यापाराच्या प्रवाहात अडथळा आल्याने अफगाण जनतेची आर्थिक स्थिती बिघडत आहे. तसेच कोरोनाचे आव्हानही कायम आहे, याकडेही मोदींनी सर्वांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवाद