शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचं समर्थन तुर्कीच्या अंगलट, मोदींनी दौरा केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 09:43 IST

काश्मीर प्रकरणात तुर्कस्थानला पाकिस्तानचं समर्थन करणं महागात पडलं आहे.

नवी दिल्लीः काश्मीर प्रकरणात तुर्कस्तानला पाकिस्तानचं समर्थन करणं महागात पडलं आहे. भारतानं तुर्कीला कडक इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा दौरा रद्द केला आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांत काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचं समर्थन करत भारताचा विरोध केला होता. एवढ्यावर न थांबता पॅरिसमध्ये झालेल्या आर्थिक परिस्थिती सोडवणाऱ्या कृती दला(Financial action task force)च्या बैठकीतही तुर्कस्ताननं पाकिस्तानचं समर्थन केलं होतं.सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कीनं वारंवार पाकिस्तानचं समर्थन केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पाऊल उचलत दोन दिवसीय दौरा रद्द केला आहे.  27-28 ऑक्टोबरला सौदी अरबमधल्या एका गुंतवणुकीसंदर्भातील शिखर परिषदेनंतर मोदींचा तुर्कस्तानचा दौरा प्रस्तावित होता. परंतु तुर्कीच्या पाकिस्तानचं समर्थन करण्याच्या भूमिकेमुळे भारत आणि तुर्कस्तानचे द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. खरं तर दोन्ही देशांमध्ये तसे फारसे व्यावहारिक संबंध आलेले नाहीत.मोदींनी तुर्कीच्या दौऱ्यात दोन्ही देशांमधील व्यापार आणि सुरक्षा संबंध सुधारण्याची आशा केली होती. परंतु आता ते अशक्यच आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयानंही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मोदींचा दौरा नियोजित नव्हता, त्यामुळे रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याच वर्षी ओसाकामधल्या जी-20 परिषदेत मोदी आणि अर्दौआन यांची भेट झाली होती, जुलै 2018मध्ये अर्दोआनसुद्धा दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी