‘निष्पापांचे मृत्यू आणि विध्वंस मान्य नाही’, मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद, दिला स्पष्ट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 00:07 IST2026-03-13T00:00:07+5:302026-03-13T00:07:35+5:30

PM Modi spoke with Iranian President Dr Masoud Pezeshkian : अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे आखातामधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक स्फोटक होत चालली आहे. तसेच हे युद्धही दिवसागणिक अधिकाधिक भयावह होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्याशी संवाद साधला.

PM Modi spoke with Iranian President Dr Masoud Pezeshkian :'Death and destruction of innocents is unacceptable', Modi's conversation with Iranian President, gave a clear message | ‘निष्पापांचे मृत्यू आणि विध्वंस मान्य नाही’, मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद, दिला स्पष्ट संदेश

‘निष्पापांचे मृत्यू आणि विध्वंस मान्य नाही’, मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद, दिला स्पष्ट संदेश

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे आखातामधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक स्फोटक होत चालली आहे. तसेच हे युद्धही दिवसागणिक अधिकाधिक भयावह होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्याशी संवाद साधला. तसेच आखातामधील सद्यस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षात सामान्य नागरिकांचे होत असलेले मृत्यू आणि पायाभूत सुविधांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली.  

या चर्चेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. त्यात मोदींनी सांगितले की, आखातामधील युद्धामुळे त्या क्षेत्रात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मी आज इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला. या संघर्षामुळे वाढत चाललेला तणाव, सामान्य नागरिकांचे होत असलेले मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचं होत असलेलं नुकसान याबाबत चिंता व्यक्त केली, असेही मोदींनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, सद्यस्थितीत या भागातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता, तसेच या भागातून होणारी मालवाहतूक आणि इंधनाचा विनाअडथळा होणे याला भरताचं सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच या भागातील शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या कटिबद्धतेबाबत या संवादादरम्यान पुनरुच्चार करण्यात आला. तसेच संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर चर्चेदरम्यान भर देण्यात आला.  

Web Title : मोदी का ईरान को संदेश: नागरिकों की मौत, विनाश अस्वीकार्य।

Web Summary : पीएम मोदी ने ईरान के राष्ट्रपति से बात की और बढ़ते संघर्ष में नागरिकों की हताहतों और बुनियादी ढांचे के नुकसान पर चिंता व्यक्त की।

Web Title : Modi to Iran: Civilian deaths, destruction unacceptable amid conflict.

Web Summary : PM Modi spoke with Iran's President about the escalating conflict and expressed concern over civilian casualties and infrastructure damage in the region.