शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचा निधी उभारणार - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:03 IST

फायदा काय? ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार

नवी दिल्ली : देशातील लहान शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे गावांमध्ये पीक कापणीनंतर लागणाºया सुविधा व रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.भगवान बलराम जयंतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काही योजनांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच काही शेतकरी सहभागी झाले होते. साडेआठ कोटी शेतकºयांना दिले १७ हजार कोटीमोदी यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत १७ हजार कोटी रुपये थेट साडेआठ कोटी शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहेत. दलालांना टाळून व कोणालाही कमिशन न देता व्यवहार पूर्ण करता आले पाहिजेत हा उद्देश सफल झाला आहे. दीड वर्षात या योजनेच्या अंतर्गत ७५ हजार कोटी रुपये शेतकºयांच्या बँकखात्यात जमा झाले. त्यातील २ हजार कोटी रुपये शेतकºयांना कोरोना साथीच्या काळात देण्यात आले आहेत.या निधीतून काय मिळेल?गावांमध्ये अन्नधान्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक गोदामेव कोल्ड स्टोअरेज बांधली जातील. रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप कंपन्या सुरू करण्याचीही सुसंधी मिळेल. कृषी पतसंस्था, शेतकरी समित्या, कृषी उद्योजक आदींना विविध वित्त संस्थांच्या माध्यमातून हे १ लाख कोटी रुपये कर्ज म्हणून वितरित करण्यात येतील.प्रकल्पांची व्यवहार्यता वाढविण्यासाठी ३ टक्के व्याज अधिग्रहण व दोन कोटी रुपयांपर्यंतची पतहमी मिळेल. यंदा १० हजार कोटी तर पुढील तीन वर्षांत दरवर्षी ३० हजार कोटी रुपये या योजनेतून वितरित केले जातील.थेट सौदा करण्याची मुभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकºयाला बाजार व बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी कुणाशीही थेट सौदा करू शकेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी