शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

योजना आयोग यापुढे ‘नियंत्रण आयोग’ नसणार

By admin | Updated: July 12, 2014 01:47 IST

योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनल्याची टीका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या आयोगाच्या नव्या भूमिकेबाबत घोषणा करतील, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनल्याची टीका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या आयोगाच्या नव्या भूमिकेबाबत घोषणा करतील, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
गेल्या  महिन्यात स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने(आयईओ) योजना आयोग प्रत्यक्षात नियंत्रण आयोग बनले असून त्याऐवजी ‘सुधारणा आणि तोडगा काढणारे ’ मंडळ अशी भूमिका असायला हवी, असे स्पष्ट केले होते. नव्या सरकारची स्थापना होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असताना आतार्पयत योजना आयोगाच्या उपाध्यक्षांची घोषणा झालेली नाही. गेल्या दहा वर्षापासून या पदावर मोंटेकसिंग अहलुवालिया होते. सरकारने योजना आयोगाच्या भूमिकेबाबत काय विचार केला आहे, असे विचारले असता जेटली एका मुलाखतीत म्हणाले की, त्याबाबत पंतप्रधानच एखादी घोषणा करतील. थोडा काळ प्रतीक्षा करा, आपल्याला लवकरच काही ऐकायला मिळेल.
सरकारच्या कार्यक्रमांची परिणामकारकता, संस्थांच्या धोरणांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी अलीकडेच मोदींनी आयईओची स्थापना केली आहे. योजना आयोगाची भूमिका केवळ राज्यांना संसाधनांचे वाटप करण्यापुरती सीमित झाली आहे. ही भूमिका वित्त आयोगाकडे द्यायला हवी. मंत्रलयांना संसाधने पुरविण्याचे काम अर्थमंत्रलयाने करावे. सध्याच्या योजना आयोगाची जागा तज्ज्ञांकडे दिली जावी, असे आयईओने सुचविले आहे. सध्याच्या स्वरूपातील आयोग व त्याचे काम देशाच्या विकासासाठी लाभकारक नाही, असे आयईओचे महासंचालक अजय छिब्बर यांनी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)