शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:43 IST

ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे.

ठळक मुद्देझोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं.पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात बँक खात्यातील तब्बल 77 हजार गमावले आहेत.विष्णू हा इंजिनिअर असून त्याने झोमॅटो फू़ड डिलिव्हरी अ‍ॅपवरून पदार्थ ऑर्डर केला होता.

पाटणा - अन्नपदार्थ ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अशा पद्धतीने पदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे. बिहारमधील पाटणा येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील एका तरुणाने झोमॅटोवरुन मागवलेली 100 रुपयांची ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात बँक खात्यातील तब्बल 77 हजार गमावले आहेत.

विष्णू हा इंजिनिअर असून त्याने झोमॅटो फू़ड डिलिव्हरी अ‍ॅपवरून पदार्थ ऑर्डर केला होता. डिलिव्हरी बॉय जेव्हा ऑर्डर घेऊन आला तेव्हा विष्णूला ऑर्डर केलेल्या पदार्थाचा दर्जा आवडला नाही. त्याने तो पदार्थ डिलिव्हरी बॉयला परत घेऊन जाण्यास सांगितलं. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने त्याला झोमॅटो कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करण्याचा सल्ला दिला. तसेच गुगलवर सर्च करून झोमॅटोचा कस्टमर केअर नंबर मिळवण्यास सांगितलं. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर ज्या सूचना मिळतील त्या फॉलो करा असं देखील डिलिव्हरी बॉयने त्याला सांगितलं.

विष्णूने गुगलवर सर्च करून जो पहिला नंबर दिसला त्यावर कॉल केला. त्यानंतर काही वेळाने त्याला एका नंबरवरून फोन आला. आपण झोमॅटो कस्टमर केअरकडून बोलत असल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितलं. तसेच 100 रुपयांची ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे रिफंड मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 रुपये जमा करावे लागतील असं विष्णूला सांगितलं. यासोबतच एक लिंक पाठवली. त्यावर क्लिक करून 10 रुपये जमा करा असं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. 

विष्णूने 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात कोणताही विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले आणि 10 रुपये त्यात जमा केले. यानंतर काही मिनिटांत त्याच्या खात्यातून तब्बल 77 हजार रुपये गायब झाले आणि बँक खातं रिकामं झालं. पेटीएमच्या माध्यमातून हे पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. तेव्हापासून विष्णू पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांसह बँक आणि इतर ठिकाणी दाद मागत आहे. मात्र त्याला मदत मिळालेली नाही. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :ZomatoझोमॅटोbankबँकBiharबिहार