शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

परवेझ खान सिमीचा कार्यकर्ता

By admin | Updated: October 29, 2015 00:28 IST

सिमी खटला : तपासाधिकारी अनिल ठाकरे यांची साक्ष

सिमी खटला : तपासाधिकारी अनिल ठाकरे यांची साक्षजळगाव: परवेझ खान हा सिमीचा कार्यकर्ता होता व मी त्याला ओळखतो अशी साक्ष तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अनिल ठाकरे यांनी न्यायालयात दिली. देशविघात कृत्य करणार्‍या सिमीच्या खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.के.पटनी यांच्या न्यायालयात यावर कामकाज झाले. ठाकरे यांनी सांगितले की,२३ ऑगस्ट २००६ रोजी आरोपी परवेझ खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सी.टी.धाकराव यांनी अटक केली होती. त्यानंतर या गुन्‘ाचा तपास मी स्थानिक गुन्हे शाखेत असताना माझ्याकडे सोपविण्यात आला होता. परवेझ खान गु.र.नं.क्रमांक १०३/२००१ मध्ये फरार होता. त्याला दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात २८ ऑगस्ट २००६ रोजी शेख सायबु शेख सुपडू याची साक्ष नोंदवून घेण्यात आली होती. त्याने पोलिसांकडे नोंदविलेल्या साक्षीत आरोपी हा सिमी संघटनेचा कार्यकर्ता होता.त्याने फारुख शेख याच्याकडे मशिदीत सिमीची बैठक घेण्याची परवानगी मागितली होती.शेख सुपडू याचा मुलगा आरोपीसोबत राहत होता.त्याला आरोपींनी काश्मीर येथे जिहादचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले होते. यापूर्वी २००१ मध्ये अकरा आरोपींविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात आसिफ याचा फरार म्हणून उल्लेख होता. दरम्यान, परवेझ याच्याविरुध्द पुरावे मिळाल्याने त्याच्याविरुध्द पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आसिफ खान याच्याविरुध्दही पुरावा मिळाल्याने वाय.डी.पाटील यांनी त्याच्याविरुध्द पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. पाटील आज हयात नाहीत तर परवेझला मी ओळखतो तो कोर्टात बसला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सरकारी वकील म्हणून ॲड.टी.डी.पाटील यांनी काम पाहिले. पुढील कामकाज १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.