शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:59 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला.

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला. त्याचदरम्यान, वडिलांनी याबाबत फोन करून कुणालातरी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावरही वरवंट्याने प्रहार केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. आई वडिलांना ठार मारल्यानंतर या तरुणाने त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते गोणीत भरून नदित फेकून दिले.

अंबेश असं या आई-वडिलांचे प्राण घेणाऱ्या नराधम मुलाचं नाव असून, श्याम बहादूर (६५) आणि बबिता (६३) अशी दुदैवी वडील आणि आईची नावं आहेत. कौटुंबिक आणि पैशांच्या वादातून मुलाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, नदीत फेकलेले मृतहेश शोधण्यासाठी व्यापक प्रमाणावर शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत श्याम बहादूर हे त्यांची पत्नी बबिता हिच्यासोबत अहमदपूर गावात राहायचे. त्यांना ३ मुली आणि अंबेश नावाचा एक मुलगा होता. अंबेश हा पत्नी आणि दोन मुलांसह कोलकाता येथे राहत होता. तीन महिन्यांपासून तो एकटाच घरी आलेला होता. तसेच घटना घडली तेव्हा घरात आई-वडील आणि मुलगा असे तिघेजणच होते.

मिळालेल्या माहितीनुसार अंबेश आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये पैसे आणि जमिनीवरून वाद नेहमी वाद व्हायचा. दरम्यान, त्यांची मुलगी वंदना हिने एके दिवशी फोन लावता असता वडिलांचा फोन लागला नाही. तसेच भावाचाही फोन लागत नसल्याने तिने तिघेही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासादरम्यान, १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी अंबेश याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो आपला जबाब सातत्याने बदलत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक सक्तीने चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

अंबेश याच्या कबुलीजबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने सांगितलं की, मी  कोरोना काळात एका मुस्लिम मुलीसोबत कोलकाता येथे लग्न केलं होतं. मला दोन मुलंही झाली. मात्र या लग्नावरून कुटुंबीय नाराज झाले होते. परधर्मातील मुलीसोबत केलेल्या लग्नावरून घरात रोज भांडणं व्हायची. मी पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी, अशी कुटुंबीयांची मागणी होती’’. अशी माहिती अंबेश याने दिली. दरम्यान,  पत्नी पोटगीसाठी पैसे मागत असल्याने अंबेश याने घरात पैशांची मागणी केली. मात्र आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून वाद वाढला आणि अंबेश याने आई-वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहांचे तुकडे करून ते गोणीत भरले आणि गोण्यांमध्ये भरलेले मृतदेह पुलावरून नदीत फेकले. त्यातील एक तुकडा गोणीत भरलेला नव्हता. तो त्याने वाराणसीला जाताना सई नदीत फेकला. त्यानंतर तो काही काळ वाराणसीमध्ये फिरला. मात्र अखेरीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Son Murders Parents, Chops Bodies, Dumps in River: Shocking Act

Web Summary : In Uttar Pradesh, a man killed his parents over money and interfaith marriage disapproval. He murdered them, dismembered the bodies, and disposed of them in a river. Police investigation revealed the gruesome crime after a missing person report.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश