शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

By admin | Updated: August 20, 2014 23:02 IST

गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े

गोलाघाट/जोरहाट : आसाम-नागालँड सीमेवरील गोलाघाट शहरात आज बुधवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला़ संतप्त जमावाने उपायुक्त कार्यालय, पोलीस ठाणो जाळण्याचा आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांना गोळीबार करावा लागला़ या गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
दरम्यान, या हिंसाचाराची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रलयाकडून अहवाल मागितला़ यानंतर काही तासांतच गृह मंत्रलयाने त्यांच्याकडे अहवाल सादर केला़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाम आणि नागालँडच्या   मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीमेवरील तणाव त्वरित संपविण्याचे निर्देश दिल़े
 गत 12 ऑगस्ट रोजी गोलाघाट जिल्ह्यात आसाम- नागालँडच्या आंतरराज्यीय सीमेलगतच्या गावात कथितरीत्या सशस्त्र नागा बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 11 लोक ठार झाले होत़े त्यानंतर गोलाघाटमध्ये हिंसाचार भडकला आह़े काल मंगळवारी एका नागरिकाच्या मृत्यूनंतर आंदोलक संतप्त झाले होत़े यानंतर पोलिसांनी लाठीमार केला होता़ आज पोलिसांच्या या कारवाईचा विरोध करीत  सुमारे हजारावर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आल़े शहराच्या इरेंगपारा चरियाली भागात आंदोलकांनी उपायुक्त कार्यालय व ठाणो जाळण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला़ यामुळे आंदोलक संतापले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली़ (वृत्तसंस्था)
 
 
अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला़ यात तीन ठार तर सहा जण जखमी झाल़े
 
4आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाम-नागालँड सीमेवरील हिंसाचार आणि तणावपूर्ण स्थितीचे संपूर्ण खापर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या माथ्यावर फोडल़े केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला़ 
केंद्र म्हणते, गोगोईंचे आरोप निराधार
4सीआरपीएफवरील मुख्यमंत्री गोगोई यांनी लावलेला निष्क्रियतेचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेटाळून लावला़ आसाम-नागालँड दोन्ही राज्यांच्या स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा हिंसाचार भडकला आहे, असे ते म्हणाले.