शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 12:25 IST

CoronaVirus कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावामध्ये हा गुराखी राहतो. त्याला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. 

बंगळुरू : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या इतरांच्या तुलनेत कमी असल्याने कर्नाटक राज्य तसे अलिप्त राहिले होते. मात्र, आज पुन्हा चर्चेत आले आहे. तिथे एका बकरी चारणाऱ्या गुराख्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावामध्ये हा गुराखी राहतो. त्याला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. 

जिल्ह्याच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गौरलहट्टी तालुक्यामध्ये जवळपास 300 घरे आहेत. येथील लोकसंख्याही खूप कमी म्हणजे 1000 एवढी आहे. या ठिकाणी गुराख्यासह दोघे गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय चार बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावकरी दहशतीमध्ये आले आहेत. गावकऱ्यांनी सांगितले की, काही बकऱ्यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. 

यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावामध्ये तातडीने पाठवून दिले आणि बकऱ्यांना गावाबाहेर क्वारंटाईन करण्यात आले. या बकऱ्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले असून हे नमुने भोपाळच्या पशु स्वास्थ्य आणि पशु उपचार संस्थेला पाठविण्यात आले आहेत. 

मृत बकऱ्यांचे पोस्टमार्टेमपशुपालन विभागाचे सचिव पी मनीवन्नन यांनी सांगितले की, या घटनेबाबत समजले आहे. मृत बकऱ्यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. या बकऱ्यांचे नमुने बंगळुरुच्या इंस्टिट्यूट ऑफ अॅनिमल हेल्थ अँड वेटेनरी बायलॉजिकल्स (IAHVB) ला पाठविण्यात आले आहेत. 

....तर हे पहिलेच प्रकरण असेलIAHVB चे संचालक डॉ. एसएम बायरेगौड़ा यांनी सांगितलेकी, माणसाकडून जनावरांना कोरोना झाल्याचे  आतापर्यंत कुठेही आढळलेले नाहीय. आमच्याकडे तपासणी किट नसल्याने हे नमुने भोपाळला पाठविण्यात आले आहेत. तर UAS च्या GKVK चे प्राध्यापक डॉ. बीएल चिदानंद यांनी सांगितले की, कोरोना व्हायरससारखे जूनोटिक व्हायरस हे सामान्यपणे जनावरांतून माणसामध्ये पसरतात. माणसांपासून जनावरांना त्यांची लागण होत नाही.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक