बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 09:25 AM2020-06-27T09:25:26+5:302020-06-27T10:59:36+5:30

महिलेच्या पोटाखालील भागामध्ये दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलला नेण्यात आले होते. यावेळी ती वास्तवात स्त्री नसून पुरुष असल्याचे तपासणीमध्ये समोर आले.

Shocking! After 9 years of marriage, wife is a 'man' not women; husband felt a mental shock | बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

Next

कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये एक अजीब घटना घडली आहे. तब्बल लग्नाच्या 9 वर्षांनंतर पत्नी स्त्री नसून पुरुष असल्याचे समजल्याने पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिला कॅन्सर झाल्याने याचा खुलासा झाला आहे. ही पुरुष पत्नी 30 वर्षांची आहे. 


महिलेच्या पोटाखालील भागामध्ये दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलला नेण्यात आले होते. यावेळी ती वास्तवात स्त्री नसून पुरुष असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. तिच्या अंडकोशाला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. कोलकाताच्या नेताजी सुभाष चंद्र बोस हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ. अनुपम दत्ता आणि डॉ. सौमन दास यांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे खरे रुप समोर आले आहे. डॉक्टरांसह तिचा पतीही शॉक झाला असून त्याचे काऊन्सेलिंगही डॉक्टरांनी सुरु केले आहे. 


डॉक्टरांनी सांगितले की, दिसायला ती महिलाच आहे. आवाज, महिलेचे शरीर आदी काही स्त्री सारखेच आहे. मात्र, तिच्या शरिरामध्ये जन्मापासून गर्भाशय आणि अंडाशय नाही. तिला कधी मासिक पाळीही आलेली नाही. हा प्रकार दुर्मिळ असून 22000 लोकांमागे एक असा व्यक्ती आढळतो. धक्कादायक म्हणजे तिच्या  28 वर्षीय बहिणीचीही तपासणी करण्यात आली. तिलाही या महिलेसारखीच समस्या असल्याचे दिसले आहे. शरिरातून ते पुरुष असतात पण बाह्य शरीर स्त्रीचे असते. महिलेला कॅन्सर असल्याने तिच्यावर किमोथेरपी केली जात असल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले. 


ही महिला एक स्त्रीम्हणूनच लहानाची मोठी झाली आहे. मात्र, एका पुरुषासोबत जवळपास एक दशक वैवाहिक आयुष्य जगली आहे. सध्या या दोघांनाही जबर धक्का बसला असून आम्ही दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी यापुढेही तसेच जीवन जगावे जसे ते गेली 9 वर्षे जगत आले आहेत. महिलेच्या दोन नातेवाईकांनाही भुतकाळात अशीच समस्या आलेली आहे. यामुळे ही समस्या जेनेटिक आहे. 


कसे समजले?
डॉक्टरांना सोनोग्राफी करताना गर्भाशय न दिसल्याने शंका आली. यामुळे त्यांनी महिलेची कॅरिओटायपिंग टेस्ट केली. यामध्ये रुग्णाच्या क्रोमोझोम्सचा अभ्यास केला जातो. या महिलेचे पुरुषासारखे क्रोमोझोम्स XY आहेत. तर सामान्य महिलेचे क्रोमोझोम्स XX असतात. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

Web Title: Shocking! After 9 years of marriage, wife is a 'man' not women; husband felt a mental shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.