शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:27 IST

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. पूनम दोन मैत्रिणींसोबत प्रयागराजसाठी निघाल्या होत्या. पण स्टेशनवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांचा जीव गेला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि ते सरकारकडे न्याय आणि मदतीची याचना करत आहेत.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि त्यांच्या मैत्रिणींचं ट्रेनचं रिजर्व्हेशन नव्हतं. त्या रात्री प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी नवी दिल्लीरेल्वे स्टेशनवर पोहोचल्या होत्या. पहिली ट्रेन रात्री ८ वाजता चुकली, त्यानंतर रात्री ९ वाजताची ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान पूनम यांनी मुलाशी फोनवर संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की, स्टेशनवर खूप गर्दी आहे आणि त्या घरी परतण्याचा विचार करत आहेत.

यानंतर पूनम यांचा फोन बंद झाला आणि काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रात्रीच्या वेळी स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आली आणि त्यात अनेक लोक जखमी झाले. जेव्हा पूनमशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तिचा पती वीरेंद्र आणि मुलगा अक्षित रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांचा शोध घेत होते. 

कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, ते आरएमएल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल आणि इतर अनेक ठिकाणी गेले. पण पूनम कुठेही सापडल्या नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडूनही त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नव्हती आणि ते रात्रभर फिरत राहिले. अखेर, त्यांना माहिती मिळाली की पूनम यांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला आहे.

पूनम यांचे ​​पती वीरेंद्र यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा अक्षित रात्रभर त्याच्या आईचा शोध घेत होता पण त्याला योग्य माहिती देण्यासाठी कोणीही नव्हतं. प्रशासनाने योग्य वेळी माहिती दिली असती तर कदाचित त्यांच्या समस्या कमी झाल्या असत्या असं कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे. आता कुटुंब सरकारकडे मदतीची याचना करत आहे आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहे. चेंगराचेंगरीमागील खरी कारणं शोधून काढावीत आणि दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा आहे.
 

टॅग्स :delhiदिल्लीrailwayरेल्वेPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा