शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:58 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढ केली.

हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी युट्यूबर ज्योती मल्होत्राच्यापोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली. ज्योती मल्होत्राला १७ मे रोजी हिसारच्या न्यू अग्रवाल एक्सटेंशन भागातून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाच दिवसांच्या रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतर, ज्योतीला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे पोलिसांनी तिच्या कोठडीची मुदत वाढवण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली आणि ज्योतीची कोठडी २६ मे पर्यंत वाढवली.

३३ वर्षीय ज्योती मल्होत्रा ​​तिच्या 'ट्रॅव्हल विथ ज्यो' या यूट्यूब चॅनलसाठी ओळखली जाते. तिच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (ISI) हेरगिरी करण्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर करण्याचा आरोप आहे. ज्योतीच्या यूट्यूब चॅनेलवर ३.७७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत.

माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती २०२३ मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती, तिथे तिची भेट दानिश उर्फ ​​एहसान-उर-रहीम या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झाली. त्यानंतर, तिने दानिशच्या माध्यमातून अली अहवान, शाकीर आणि राणा शाहबाज सारख्या इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क केला.

हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार म्हणाले की, ज्योती हिच्यावर १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३ आणि ५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या घरातून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, बँकेची कागदपत्रे आणि पासपोर्ट जप्त केले आहेत, जे फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. 

हिसार पोलिस, राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून ज्योती मल्होत्राची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीने चौकशीदरम्यान कबूल केले आहे की ती २०२३ मध्ये दोनदा पाकिस्तानला गेली होती आणि तिथे तिची भेट दानिशच्या ओळखीच्या अली अहवानशी झाली होती, तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी स्पष्ट केले की ज्योतीने संरक्षण किंवा धोरणात्मक माहिती सामायिक केल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. तसेच, त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस