शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

1,2,3 नाही तर 10 नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार; PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:51 IST

New Vande Bharat Express Train : यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.

New Vande Bharat Express Train : 2019 साली 'मेक इन इंडिया' अंतर्गत पहिली Vande Bharat Express Train सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे. देशभरातील अनेक मार्गांवर ही सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 15 सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथून देशातील विविध राज्यांसाठी आणखी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.

या मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन धावणार 

  • टाटानगर - पाटणा वंदे 
  • वाराणसी - देवघर वंदे
  • टाटानगर-ब्रह्मपूर वंदे 
  • रांची-गोड्डा 
  • आग्रा-बनारस 
  • हावडा-गया 
  • हावडा-भागलपूर 
  • दुर्ग-विशाखापट्टनम
  • हुबळी-सिकंदराबाद 
  • पुणे-नागपूर 

लवकरच स्लीपर वंदे भारत सुरू होणारदेशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या मॉडेलची झलक दाखविली. बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले प्रोटोटाइप मॉडल बनून पूर्ण झाले आहे. या ट्रेनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इतकेच नव्हे तर प्रवासी, रेल्वेप्रेमी यांच्याकडून नव्या कोऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे.  800-1200 किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी ‘स्लीपर वंदे भारत’ तयार केली आहे. मध्यमवर्गीयांना विचारात घेऊन गाडी बनविली असून राजधानी एक्स्प्रेसएवढे भाडे राहील. 

काय आहे या नव्या गाडीत खास...नव्या गाडीत संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी येईल. नवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबुती वाढते. ट्रेनचे डबे आणि शॉचालय अपग्रेड करण्यात आले आहे. याशिवाय ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत. देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविली आहे. 

या आहेत सुविधासीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची सोय आहे. याशिवाय, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. एसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर मिळेल. तसेच, वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना. सामान ठेवण्यासाठी जास्त जागा अन् दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असेल. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे