शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:18 PM

नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती..

ठळक मुद्दे नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार

पुणे: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी  (नेट)  अर्ज करण्यास येत्या 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती.परंतु,येत्या 15 जूनपर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.देशभरात ‘एनटीए'तर्फे नेट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी  मुदतवाढीची मागणी केली होती. एनटीएने मुदतवाढ दिल्याने अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास संधी उपलब्ध झाली आहे.नेट परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन एनटीएने केले होते. मात्र,अर्जासाठी कालावधी वाढविण्यात आल्याने जून महिन्यात परीक्षा होणे शक्य नाही. त्यामुळे नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाTeacherशिक्षकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय