शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:46 IST

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाच्या दोन खासदारांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Narendra Modi Oath Taking Ceremony : भारताच्या राजकारणात आज ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएमधील सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (TDP) दोन खासदारांची केंद्रात वर्णी लागणार आहे. यामध्ये श्रीकाकुलममधून तीन वेळा खासदार राहिलेले 36 वर्षीय किंजरापू राम मोहन नायडू आणि पहिल्यांदाच खासदार झालेले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (48) यांच्या नावांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मोहन नायडू यांना कॅबिनेट मंत्री, तर पेम्मासानी यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. राज्यातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या राम मोहन नायडू यांनी उत्तर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधून YSRCP च्या टिळक पेराडा यांचा तब्बल 3.2 लाख मतांच्या फरकाने पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. नायडू यांना 7 लाख 54 हजार 328 मते मिळाली, तर YSRCP उमेदवार टिळक पेराडा यांना 4 लाख 26 हजार 427 मते मिळाली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला फक्त 7172 मते मिळाली.

कोण आहेत राम मोहन नायडू ?
राम मोहन नायडू यांचे वडील येरन नायडू हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. 1996 ते 1998 दरम्यान ते संयुक्त आघाडी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांचे काका के अत्चेनायडू हे टेक्कालीचे आमदार आणि टीडीपी राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर राम मोहन नायडू यांनी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर लाँग आयलंडमधून एमबीए केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजकाणात एंट्री घेतली आणि आता त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

श्रीमंत खासदारांच्या यादीत चंद्रशेखर यांचा समावेश 
टीडीपीचे दुसरे नेते डॉ.चंद्रशेखर केंद्रीय मंत्री होणार आहेत. त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून टीडीपीसाठी काम करत आहे. टीडीपीने चंद्रशेखर यांना गुंटूरमधून पहिल्यांदा तिकीट दिले आणि त्यांनी वायएसआरसीपीच्या किलारी व्यंकट रोसैया यांचा पराभव केला होता. TDP नेत्याला 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली, तर YSRCP नेते किलारी वेंकट रोसैया यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली. 

विशेष म्हणजे डॉ. चंद्रशेखर लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे 5,785 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. डॉ. चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये डॉ. एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एमबीबीएस केले आहे, त्यानंतर 2005 मध्ये अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी केले आहे.
 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी