"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:56 IST2025-06-12T17:56:02+5:302025-06-12T17:56:44+5:30

"मला, माझ्या मुलाला भेटण्यासाठी आत जायचे आहे...!"

My son jumped from the second floor of hostel building He had gone for lunch there where the plane crashed | "माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"

"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान (AI-171) अवघ्या 5 मिनिटांत कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते, यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. धावपट्टीवरून उड्डाण करताच हे विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. दरम्यान, आपला मुलगा लंच ब्रेकवर याच वस्तिगृहात गेला होता. दुर्घटना घडली तेव्हा त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. तो सुरक्षित आहे, असे रमीला बेन नावाच्या एका महिलेने म्हटले आहे.

"मला माझ्या मुलाला आत जाऊन भेटायचे आहे..." -
एएनआय (ANI) सोबत बोलताना रमीला बेन यांनी सांगितले की, "विमान वस्तिगृहावरच कोसळले. माझ्यामुलाला काहीही झाले नाही. माझे त्याच्यासोबत बोलणे झाले आहे. मला, माझ्या मुलाला भेटण्यासाठी आत जायचे आहे. मुलगा सांगतोय की, आपण बरे आहोत. दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने थोडी दुखापत झाली आहे. मी आत गेले की नेमके काय झाले ते कळेल."

विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी? - 
या घटनेनंतर एअर इंडियाचे निवेदनही समोर आले आहे. यात क्रॅश झालेल्या विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.  

बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान -
अहमदाबादहून दुपारी 1:38 वाजता निघालेले हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (VT-ANB) विमान होते. जे अहमदाबाद एयरपोर्टच्या रनवे 23 वरून टेकऑफ करत होते. टेकऑफनंतर लगेचच विमानाने ATC ला ‘मेडे’ कॉल केला. मात्र यानंतर विमानाचा संपर्क तुटला. यानंतर ही दुर्घटना घडली.


 

Web Title: My son jumped from the second floor of hostel building He had gone for lunch there where the plane crashed