शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या क्षणापर्यंत चिखलफेक सुरूच

By admin | Updated: February 6, 2015 02:14 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आम आदमी पार्टी आणि भाजप यांची एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आम आदमी पार्टी आणि भाजप यांची एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. भाजप मतदारांना पैसे आणि मोफत मद्य वाटप करून मते खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपने गुरुवारी केला. हा पक्ष लोकांना पैसे, मद्य आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे वाटप करीत असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. एवढेच नाहीतर गरिबांची मतदार ओळखपत्रेही ताब्यात घेण्यात येत आहेत, अशी तक्रार आपचे नेते आशुतोष यांनी केली. आपला मतदान केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या देऊन मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचाही प्रकार सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४आपच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा म्हणाले की, या निवडणुकीत त्यांनी (आप) आपल्या पक्षाची तिकिटे विकली. त्यांचे उमेदवार निवडणुकीत मोफत मद्यपुरवठा करण्यासाठी त्याची जमवाजमव करताना आढळून आले आहेत. ४सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगावरसुद्धा आरोप करण्याची त्यांना सवय आहे; परंतु आपल्याला मात्र कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे नाही, असा त्यांचा समज झाला आहे. हवालामार्फत निधी गोळा करणे आणि काळ्या पैशाच्या आरोपात हाच पक्ष सध्या गोवला गेला आहे, याकडेही नरसिंहा यांनी लक्ष वेधले.