शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा सावध अंदाज

By admin | Updated: April 23, 2015 06:11 IST

स्कायमेट या खासगी संस्थेने १०३ टक्के पावसाचे शुभसंकेत दिलेले असतानाच लागोपाठ दुसऱ्याही वर्षी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी केंद्र सरकारने अंदाजातही

नवी दिल्ली : स्कायमेट या खासगी संस्थेने १०३ टक्के पावसाचे शुभसंकेत दिलेले असतानाच लागोपाठ दुसऱ्याही वर्षी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी केंद्र सरकारने अंदाजातही आखडता हात घेतला. या कमी पावसाला अल-निनो जबाबदार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे आधीच शेतकरी संकटात सापडला असताना अंदाज वर्तवितानाही सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. यंदाच्या मान्सूचा पहिला अंदाज बुधवारी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचा परिणाम होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यंदा सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता २८ टक्के आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३३ टक्के आहे. त्याचवेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही सांगण्यात आले आहे. देशाच्या कोणत्या भागात कसा पाऊस पडेल, याचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याने त्याचा देशाच्या वायव्य भागांत आणि मध्य भारतावर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. मान्सून दीर्घकालिक सरासरीच्या ९३ टक्के राहील आणि तो सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)